प्रत्येक महिला ही ग्लॅमरस लुकसाठी विविध प्रकारचे आऊटफिट घेत असते. कारण फॅशन हा स्वतःला व्यक्त करण्याचा एक चांगला मार्ग आहे. आपण बऱ्याचदा असे कपडे निवडतो जे आपल्या कर्व्ह्स आणि वैशिष्ट्यांना योग्य प्रकारे वाढवतात. विशेषत: प्रत्येक प्रसंगासाठी आरामदायी आणि ट्रेंडी लूक तयार करण्यासाठी महिला भरपूर शॉपिंग करून त्याच्या साईझनुसार कपड्यांची निवड करत असतात. परंतु प्लस साइज महिलांसाठी आउटफिट निवडणे कधीकधी थोडे अवघड असू शकते.
लावण्या द लेबलच्या फाउंडर पूजा चौधरी यांनी प्लस साइज महिलांसाठी स्टायलिश आउटफिट्स निवडताना त्यांचे सौंदर्य वाढवणारे आणि त्यांना कम्फर्टेबल वाटेल असे कपडे घालणे गरजेचे आहे. तर यावेळी त्यांनी काही प्लस साइज महिलांची चिंता दूर करत स्टायलिश आउटफिट्सबद्दल सांगितले आहे, जे तुमच्या वॉर्डरोबमध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतात.
फ्लोई मॅक्सी ड्रेस
प्रत्येक मुलीच्या व महिल्यांच्या वॉर्डरोबमध्ये फ्लोई मॅक्सी ड्रेस असावा. कारण हे कोणत्याही प्रसंगासाठी आरामदायी, फॅशनेबल आणि परफेक्ट आउटफिट्स असल्याने तुम्ही हे आऊटफिट परिधान करू शकता. कारण याने बॅन्डेड कंबर आणि फ्लोइंग स्कर्ट असलेला मॅक्सी ड्रेसने तुमचा ग्लॅमरस लुक चांगला दिसतो. तसेच तुमच्या सनड्रेस कलेक्शनमध्ये खूप साऱ्या प्रकारचे फ्लोरल मोटिफ, स्ट्राइकिंग पॅटर्न किंवा मोनोटोन रंग असलेल्या कपड्यांचा समावेश करा.
हाय-वेस्ट प्लाझो पँट आणि ट्यूनिक
प्लाझो पँट अत्यंत आरामदायक आणि फॅशनेबल आहे. सम सिल्हूट देण्यासाठी हाय-वेस्ट प्लाझो पँट लांब सैल ट्यूनिकसह परिधान करा. कॅज्युअल किंवा सेमी-फॉर्मल प्रसंगांसाठी हे उत्तम आउटफिट आहे. तुम्ही त्यांना सहजपणे सांभाळू शकता.
स्लिम फिट जीन्स आणि ओव्हरसाईज शर्ट
ट्रेंडी आणि कम्फर्टेबल लुक हवा असेल तर स्लिम फिट जीन्ससह ओव्हरसाईज शर्ट घाला. हा लूक केवळ फॅशनेबल च नाही तर तो परिधान केल्याने तुमचा खूप आत्मविश्वासही वाढेल.
स्ट्रेट-लेग पँटसह पेप्लम टॉप
जर तुम्हाला ट्रेंडी दिसण्यासोबतच तुमचा कम्फर्टेबल लुक ही हवा असेल तर पेप्लम टॉप हा परफेक्ट ऑप्शन आहे. स्ट्रेट-लेग पँटसह ते चांगले दिसतात, जे लुकला स्लीक फिनिश देण्याचे काम करतात.