मुंबई : रजोनिवृत्ती अर्थात मेनोपॉज ही महिलांच्या आयुष्यातील एक सामान्य प्रक्रिया आहे. जी साधारणतः 45 ते 55 वर्षे वयोगटातील प्रत्येक स्त्रीला सहन करावी लागते. पण आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे महिला प्री-मेनोपॉजला सामोऱ्या जात आहेत. सध्या बऱ्याच महिलांना वयाच्या 40व्या वर्षी रजोनिवृत्ती अर्थात मेनोपॉजच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे (Pre Menopause reasons and process for becoming a mother after Menopause).
याचा सर्वाधिक फटका काही कारणास्तव वयाच्या 30 वर्षानंतर लग्न करणाऱ्या स्त्रियांना सहन करावा लागतो. रजोनिवृत्तीच्या पूर्वस्थितीमुळे बर्याच स्त्रिया मातृत्वाच्या आनंदांपासून वंचित राहतात. जर तुम्ही प्री-मेनोपॉजच्या प्रक्रियेतून जात असाल आणि तुम्हाला आई बनवायची असेल तर काळजी करू नका. आता तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, रजोनिवृत्तीनंतरही तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते.
जेव्हा, स्त्रीच्या अंडाशयातील अंडी संपतात, तेव्हा मासिक पाळी थांबते, या स्थितीस मेनोपॉज म्हणतात. सोप्या शब्दांत, रजोनिवृत्ती म्हणजे एखाद्या महिलेची मासिक पाळी कायमस्वरूपी थांबते. यानंतर, कोणतीही स्त्री नैसर्गिकरित्या गर्भवती होऊ शकत नाही. सामान्यत: रजोनिवृत्ती 45 ते 55 वर्षांच्या दरम्यान असते. या वयोमर्यादेपूर्वी होण्याऱ्या रजोनिवृत्तीच्या स्थितीस ‘प्री मेनोपॉज’ म्हणतात. तर, यानंतरच्या स्थितीस ‘पोस्ट मेनोपॉज’ म्हणतात. दोन्ही वेळी महिलांना बर्याच समस्यांचा सामना करावा लागतो.
साधारण पाच वर्षांआधीच मेनोपॉजची लक्षणे दिसू लागतात. अशा परिस्थितीत महिलांना मासिक पाळीतील अनियमितता, जास्त उष्णता, त्वचेचा काळेपणा, वजायनल कोरडेपणा, मूड स्विंग, चिडचिडेपणा यासारखे लक्षणे दिसू लागतात (Pre Menopause reasons and process for becoming a mother after Menopause).
मेनोपॉजनंतर महिलांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन्ही हार्मोन्सची उत्पत्ती थांबते. हे हार्मोन्स हाडे मजबूत करतात आणि हृदयासाठी चांगले असतात. हार्मोन्सचे तयार न झाल्यामुळे हाडे कमकुवत होतात आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. याशिवाय बर्याच वेळा हाय बीपी आणि हृदयाशी संबंधित समस्या देखील दिसू लागतात. दुसरीकडे, जर हा प्री मेनोपॉज असेल तर, अशा समस्या स्रियांना वेळे आधीच सहन कराव्या लागतात. अशा परिस्थितीत तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
तंत्रज्ञानाच्या या जगात रजोनिवृत्तीनंतरही आई होणे शक्य झाले आहे. परंतु, यासाठी दुसर्या महिलेच्या अंड्यांची आवश्यकता आहे. यात आयव्हीएफद्वारे, दुसर्या महिलेचे अंडे फलित करून, मातृत्वाचा आनंद घेऊ इच्छित असणाऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जाते.
(Pre Menopause reasons and process for becoming a mother after Menopause)
हेही वाचा :
सावधान! अपुरी झोप स्त्रियांसाठी घातक, कर्करोगासह ‘या’ गंभीर समस्यांना ठरेल कारणीभूत…https://t.co/DvQbaECMps#SleepingProblems #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 18, 2020