मुंबई : तरूणाई ज्या दिवसांची आतुरतेने वाट पाहात असते त्या वैलेंटाईन वीकला कालपासून सुरूवात झालेली आहे. आज वैलेंटाईन वीकचा दुसरा दिवस प्रपोज डे (Propose Day) साजरा केला जात आहे. आपल्या जीवनातील प्रिय व्यक्तीला मनातील भावना सांगण्यासाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. तुम्हाला जर एखाद्या प्रिय व्यक्तीला लग्नाला मागणी घालायची असेल तर आजचा दिवस अत्यंत खास आहे. याशिवाय तुम्ही तुमच्या जोडीदाराला आज पुन्हा एकदा प्रपोज करून तुमच्या मनातील भावना व्यक्त करा. त्यासाठी तुम्ही काही शुभेच्छा संदेशसुद्धा पाठवू शकता.
नाही आजपर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुला सांगणार आहे…
नाही मी जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकंच तुला सांगणार आहे…
Happy Propose Day!
स्पर्श तुझा व्हावा
अन् देह माझा चुरावा
हक्काने मिठीत तू घ्यावेस
जसा पाण्यावरी स्पर्श चांगण्यांचा असावा
Happy Propose Day!
तू हो म्हणालीस तर होईल
प्रत्येक क्षण खास
आयुष्यभर मिळेल का
मला तुझा सहवास?
Happy Propose Day!
श्वास असेपर्यंत तुला साथ देईन,
दुःखाच्या वादळातही तुझ्या सोबतच राहीन,
माहीत नाही असा क्षण पुन्हा केव्हा येईल,
आज दिवसभर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन…
Happy Propose Day!
ओढ लागलीया तुला मिळवायची,
तू मला समजून घेशील का?
लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं
प्रेम तुझं देशील का?
थांबव आता खेळ हा स्वप्नांचा
कायमची माझी होशील का?
Happy Propose Day!
प्रेमाचा खरा अर्थ
तू मला समजून सांगितलास
माझ्या आयुष्याचा खरा अर्थ
तू मला उमगवून सांगितलास
Happy Propose Day!
समुद्राला किनाऱ्याची साथ
चंद्राला चांदण्यांची साथ
तू फक्त दे माझ्या हातात हात
मी देईन तुला जीवनभर साथ
Happy Propose Day!
चंद्रास साथ जशी चांदण्यांची
तशी साथ तू मला देशील का?
जीवनाच्या या सुंदर प्रवासात
तुझा हात हाती देशील का?
Happy Propose Day!