मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटींच्या आयुष्यात फॅशन ही महत्वाची भूमिका असते. म्हणूनच बहुतेक वेळी सेलिब्रिटींना त्यांच्या बेस्ट आउटफिट्समध्ये पाहिलं जातं. यामागे एक कारण म्हणजे त्यांच्यावर फॅशनचा खूप दबाव आहे. कधीकधी अभिनेत्री एकमेकींशी मॅचिंग ड्रेस परिधान करतात. अशा परिस्थितीत फॅशन फेस ऑफ करणं सामान्य आहे. आज आपण दोन लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉय आणि रकुल प्रीत सिंह यांच्या फॅशन फेस ऑफवर बोलूयात.
मौनी रॉय आणि रकुल प्रीत सिंह त्यांच्या फॅशन सेन्समुळे बर्याचदा चर्चेत असतात. दोघीही अनेकदा चाहत्यांना त्यांच्या स्टाईल आणि फॅशन स्टेटमेंटमुळे फॅशन गोल्स देताना दिसतात. नुकतंच दोन्ही अभिनेत्रींनी एकाच प्रकारचा ऑफ शोल्डक ड्रेस परिधान करताना दिसल्या. चला या दोघांनीही कोणत्या ड्रेससोबत स्टाईल केलं आहे हे जाणून घेऊया.
रकुलप्रीत सिंह
ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये रकुल प्रीत सिंहला स्पॉट करण्यात आलं. या ड्रेसमध्ये रकुलप्रीत जबरदस्त आकर्षक दिसत होती. हा ड्रेस रिया पिल्लई रस्तोगी यांनी डिझाइन केला आहे. अभिनेत्रीनं कमीतकमी मेकअप करून तिचं हे लुक कॅरी केलं आहे.
या अभिनेत्रीनं ड्रेसबरोबर मॅचिंग हील्स घातली होती. तिचा लूक सेलिब्रिटी स्टायलिस्ट अनिशा जैन यांनी स्टाईल केला आहे.
मौनी रॉय
मौनी रॉय ही सध्या तिच्या स्टाईल आणि फॅशन स्टेटमेंटविषयी चर्चेत आहे. 2019 मध्ये एका इव्हेंट दरम्यान मौनीनं हा ड्रेस परिधान केला होता. तिला स्टाईल केले आहे ईशिका देवनानी यांनी. या ड्रेप ड्रेसमध्ये मौनी खूपच खूश दिसत होती. तिनं तिचे केस कर्ली केले होते.
संबंधित बातम्या
Photo : ‘दशकातील शेवटचा चित्रपट हिरकणी’, सोनाली कुलकर्णीकडून आठवणी शेअरhttps://t.co/kTj6wnwPFI@meSonalee #SonaleeKulkarni #Hirkani
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 8, 2021