Rath Saptami 2021 | ‘वसंत पंचमी’नंतर आता ‘रथ सप्तमी’ही फळणार, नोकरीत पदोन्नतीसाठी ‘हे’ उपाय करा!

| Updated on: Feb 16, 2021 | 4:30 PM

माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या सातव्या दिवशी रथ सप्तमी साजरी केली जाते. या दिवशी भगवान सूर्य देवाची पूजा केली जाते.

Rath Saptami 2021 | ‘वसंत पंचमी’नंतर आता ‘रथ सप्तमी’ही फळणार, नोकरीत पदोन्नतीसाठी ‘हे’ उपाय करा!
सूर्यदेव
Follow us on

मुंबई : माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या सातव्या दिवशी रथ सप्तमी साजरी केली जाते. यावेळी रथ सप्तमी 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. या दिवशी भगवान सूर्य देवाची पूजा केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. एखादी व्यक्ती आजारी असल्यास ती रोगमुक्त होते, त्याच्या कारकिर्दीतील अडथळे दूर होतात आणि त्या व्यक्तीची प्रगती होते (Rath Saptami 2021 special solutions for financial growth and good health).

रथ सप्तमीच्या या शुभ दिवशी केलेले स्नान, दान, होम, पूजा इत्यादी गोष्टी हजारो पटीने जास्त फळ देतात. रथ सप्तमी ‘अचला सप्तमी’, ‘पुत्र सप्तमी’ आणि ‘आरोग्य सप्तमी’ म्हणूनही ओळखली जाते. जर तुमच्या आयुष्यात अशा काही समस्या सुरु असतील, तर रथ सप्तमीच्या दिवशी ‘हे’ उपाय करा.

– जर आपणास आर्थिक संकटाचा सामना करावा लागला असेल, तर रथ सप्तमीच्या दिवशी सूर्याला अर्ध्य अर्पण केल्यावर तांबे, गुळ, गहू किंवा डाळ आपल्या क्षमतेनुसार दान करा. यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली होते.

– नोकरीत प्रगती करण्यासाठी रथ सप्तमीच्या दिवशी तांब्याचा एक तुकडा घ्या आणि त्याचे दोन भाग करा. एक भाग वाहत्या पाण्यात सोडा आणि दुसरा आपल्या जवळ पर्समध्ये ठेवा. हा दुसरा तुकडा कायम आपल्याजवळ ठेवा. याने केवळ आपली करिअर सुधारत नाही, तर आरोग्याच्या बाबतीतही त्याचा चांगला फायदा होईल (Rath Saptami 2021 special solutions for financial growth and good health).

– रथ सप्तमीच्या दिवशी अंघोळ करत असताना त्या पाण्यात खसखसचे फुल किंवा कोणतेही लाल फुल टाकून अंघोळ करा. आंघोळ झाल्यावर तुपाचे दिवे आणि लाल फुले, रोली, अक्षत, कापूर आणि धूप घेऊन सूर्य देवाची पूजा करावी आणि गायत्री मंत्र किंवा सूर्य मंत्राचा जप करावा. हे आपल्या जन्मकुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत करेल आणि शिक्षणात येणारे अडथळे दूर करेल. तसेच, आरोग्य चांगले राहील आणि मुलांची प्रगती होईल.

सूर्यदेवाच्या जन्माचा उत्सव

सूर्यदेव यांच्या जन्माचा उत्सव म्हणून देखील रथ सप्तमी साजरा केली जाते. असे मानले जाते की, भगवान सूर्य यांचा जन्म या दिवशी कश्यप ऋषी आणि आदिती यांच्या मिलनाने झाला होता. म्हणून हा दिवस सूर्य देवाची उपासना करण्याचा दिवस मानला जातो. तसेच असेही मानले जाते की, या दिवसापासून सूर्याचे सात घोडे आपला रथ घेऊन धाऊ लागतात, म्हणूनच या दिवसाला रथ सप्तमी म्हणतात.

(टीप : सदर माहिती मान्यतांवर आधारित असून, याद्वारे कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही.)

(Rath Saptami 2021 special solutions for financial growth and good health)

हेही वाचा :