मुंबई : प्रत्येक भाजी खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आजपर्यंत तुम्ही बर्याच प्रकारच्या भाज्या खाल्ल्या असतील. पण, तुम्ही कधी लाल कोबीची भाजी खाल्ली आहे का? बहुतेक लोक हिवाळ्याच्या हंगामात लाल कोबीचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करतात. बरेच लोक या दिवसांत लाल कोबीची भाजी तयार तयार करतात (Red Cabbage health benefits).
केवळ वेगळा रंग हे या कोबीचे वैशिष्ट्य नाही. तर यात आढळणारे घटक शरीरात रक्ताची कमी निर्माण होण्यापासून संरक्षण करतात. तसेच, यातील घटक कर्करोगासारख्या आजारांपासून आपले संरक्षण करतात. लाल (जांभळा) कोबी अँटिऑक्सिडेंटचा शक्तिशाली स्रोत आहे. कोबी अँटिऑक्सिडंट्सच्या बाबतीत शरीराला अनेक फायदे देतो, तर फ्रि रॅडिकल्स विरूद्ध लढण्याच्या बाबतीत भाज्यांचा गडद आणि जांभळा रंग अधिक शक्तिशाली असतो.
लाल कोबीमध्ये व्हिटामिन सी, के आणि ए जास्त प्रमाणात असतात. या कोबीमध्ये पॅन्टोथेनिक अॅसिड (बी 5), पायरीडोक्सिन (बी 6), थायमिन (बी 1), राइबोफ्लेविन (बी 2) नियासिन (बी 3) सारखी आवश्यक जीवनसत्त्वे देखील मुबलक प्रमाणात आढळतात. त्यात मॅंगनीज, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम आणि जस्त खनिजे, विशेषत: सोडियम आणि पोटॅशियम असतात. ही विद्रव्ये फायबरचा चांगला स्रोत आहे. चला तर याच्या अनेक फायद्यांविषयी जाणून घेऊया…
दररोज लाल कोबीचे सेवन केल्यास आपले वजन कमी होईल. त्यात कमी कॅलरी घटक आणि उच्च फायबर घटक आहे. तसेच यात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील आहेत.
लाल कोबी नेहमी हिरव्या कोबीपेक्षा अधिक फायदेशीर ठरतो. यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स आहेत जे कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी कार्य करतात. यात कॅरोटीनोईड्स, फ्लेव्होनॉइड्स यासारखे पौष्टिक गुणधर्म आहेत. हे हृदय आणि कर्करोगासारखे आजार रोखण्याचे काम करतात (Red Cabbage health benefits).
लाल कोबी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात बरेच पौष्टिक पदार्थ आहेत. हे सॅलडमध्ये खाल्ल्याने शरीरातील चांगले बॅक्टेरिया वाढतात. तसेच पचनशक्ती मजबूत होते. याशिवाय दररोज लाल कोबी खाण्याने आतड्यातील सूज कमी होण्यास मदत होते.
सांधेदुखीमध्ये लाल कोबी खाणे फायदेशीर ठरते. आपण इच्छित असल्यास, संधिवातच्या वेदना होत असताना, सांध्यावर कोबीची पाने लपेटल्याने वेदनामध्ये थोडा आराम मिळेल. तथापि, त्याचा उपयोग औषधापेक्षा कमी प्रभावी आहे.
(टीप : वरील माहिती संशोधनावर आधारित असून, कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Red Cabbage health benefits)
Papaya | केवळ पपईच नव्हे तर, पपईच्या बियादेखील आरोग्यवर्धक, जाणून घ्या याचे फायदे…https://t.co/45NyovSpYE#Papaya #PapayaSeeds #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 24, 2020