रात्रीच्या वेळी वेळेवर झोप येणे फायद्याचे असते. अनेक जण बिछान्यावर तळमळत पडलेले असतात. अनेक जण वेळेवर झोपायला जाऊनही त्यांना नीट झोप येत नाही. रात्री वेळेत झोपल्यास सकाळी लवकरच जाग येते आणि दिवसभर ताजे तवाने वाटते आणि दिवसही चांगला जातो. पुरेशी झोप झाली असली तर शरीरात संपूर्ण दिवसभर ऊर्जा राहाते. सद्गुरुंनी चांगली झोप येण्यासाठी काही टीप्स दिलेल्या आहेत. या टीप्स अंमलात आणल्या तर चांगली झोप येऊन आपला दिवस उत्साहाने भरलेला असेल, तर पाहूयात सद्गुरुंनी नेमक्या काय टीप्स दिलेल्या आहेत.
अनेक जणांना झोप न येण्याची समस्या असते. जर तुम्ही त्यापैकी एक आहात तर सद्गुरुंनी ( Sadhguru Jaggi Vasudev ) सांगितलेला झोपेसाठी सांगितलेले उपाय आजमावून पाहा.आपण या लेखात सद्गुरुंनी गाढ झोप येण्यासाठी काय सांगितले ते पाहाणार आहोत. हे उपाय अमलात आणले तर तुम्हाला चांगली झोप येईल.
रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ केली तर दिवसभरातील थकवा आणि शरीरावर आलेला ताण दूर होतो. त्यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि गाढ झोप येते. आंघोळ केल्याने शरीर स्वच्छ होते. ताजे वाटते. नियमितपणे जर रात्री झोपताना आंघोळ केली तर दिवसभरातील शरीरावर घाण निघून जाते. झोपेची गुणवत्ता सुधारते.
जेवणानंतर लागलीच बिछान्यावर पडू नये. जे लोक जेवण झाल्या झाल्या झोपायला जातात त्यांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. खरे तर जेवणानंतर दोन ते तीन तासांनी झोपायला हवे.जर तुम्ही झोपण्याआधी खूप तास आधी जेवला असाल तर तुम्हाला पोटाचे कोणतेही आजार होणार नाही. गॅस आणि अपचनाचा त्रास दूर होईल. जेवणानंतर काही तासांनी झोपल्याने जेवण चांगल्या प्रकारे पचते.