उत्तर प्रदेशातील वाराणसी हे एक ऐतिहासिक शहर आहे. यात तुम्हाला अनेक धार्मिक आणि पर्यटन स्थळे पाहायला मिळतात. तुमच्यासाठी थंडीच्या दिवसात वाराणसीला जाणे हा एक अद्भुत अनुभव असू शकतो, विशेषत: जेव्हा तुम्ही तेथील पवित्र मंदिरांना भेट द्याल तेव्हा तुमचं मन आसपासच वातावरण पाहून प्रसन्न होईल. खास करून वाराणसीला गेल्यावर सगळ्यांचे आवडते ठिकाण म्हणजे गंगा आरती. गंगा आरती हा एक विलक्षण सोहळा दररोज रात्री नदीकाठी अनेक दिव्यांच्या प्रकाशाने भरतो. तुम्ही सुद्धा हिवाळ्यात वाराणसीला जाण्याचा प्लॅन करत असाल तर हे ठिकाण अवश्य पहावे.
1. काशी विश्वनाथ मंदिर
वाराणसीचे सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर आहे. हे भगवान शंकराला समर्पित भव्य सुवर्ण काशी असून 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. येथे आल्यावर तुम्हाला येथील वातावरणाच्या सानिध्यात आत्मिक शांती आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभवता येते.
2. मृत्युंजय महादेव मंदिर
भगवान शंकराच्या “महामृत्युंजय” रूपाला समर्पित असलेले हे मंदिर जीवनातील संकटांपासून मुक्ती आणि आरोग्यासाठी प्रार्थना करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
3. केदारेश्वर मंदिर
तुम्ही जेव्हा वाराणसीत प्रसिद्ध मंदिरांना भेट देता तेव्हा या ठिकाणी केदारनाथ धामप्रमाणेच भगवान शंकराला समर्पित हे मंदिर गंगा नदीच्या जवळ बांधलेले आहे. बनारसच्या दक्षिण भागात वसलेले हे एक प्रमुख तीर्थक्षेत्र मानले जाते.
4. दुर्गा कुंड मंदिर
वाराणसीत असलेले देवी दुर्गा मातेचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे. हे मंदिर आपल्या विशेष स्थापत्य आणि कुंडासाठी प्रसिद्ध आहे. नवरात्रीमध्ये येथे विशेष पूजा केली जाते, परंतु हिवाळ्यातही त्याचे दिव्यत्व अनन्यसाधारण असते.
5. संकेतेश्वर महादेव मंदिर
वाराणसीत तुम्हला असंख्य मंदिरे दिसतील त्यातील एक संकेतेश्वर महादेव मंदिर हे मंदिर भगवान शंकराच्या सांकेतिक रूपाला समर्पित आहे आणि शुभ संकल्पांच्या पूर्ततेचे केंद्र मानले जाते.
6. अन्नपूर्णा देवी मंदिर
अन्न आणि समृद्धीची देवी असलेल्या अन्नपूर्णा देवीला समर्पित हे मंदिर काशी विश्वनाथ मंदिराच्या जवळ बांधलेले आहे. तसेच या देवीच्या मंदिरात जाऊन तुम्ही दर्शन घेतल्यास तुमच्या इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.
7. संकट मोचन हनुमान मंदिर
हनुमानाचे हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही जेव्हा हनुमानाचे दर्शन घ्याल तेव्हा तुमच्या येणारे संकट आणि अडथळे दूर करते. म्हणून हे संकट मोचन हनुमानाचे मंदिर आहे. तसेच येथील येणाऱ्या भाविकांकडून हनुमान चाळीसाचे नियमित पठण केले जाते.
अश्यातच तुम्ही सहकुटुंब तसेच मित्र परिवाराबरोबर वाराणसीतील तीर्थक्षेत्रांना व मंदिरात जाण्याबरोबरच गंगा आरतीचाही अनुभव घ्यावा. तसेच हिवाळ्यात इथे गेल्यावर कचोरी-भजी आणि बनारसी थंडाई सारख्या वाराणसीच्या प्रसिद्ध पदार्थांची चव चाखायला विसरू नका.
दिल्ली ते वाराणसी प्रवासाचे पर्याय
१. बसचा प्रवास
अंतर : अंदाजे ८५० किलोमीटर
वेळ: 12-14 तास
बस :
उत्तर प्रदेश राज्य परिवहन महामंडळ (यूपीएसआरटीसी) व्होल्वो आणि साधारण बसेस.
खासगी ऑपरेटर्सच्या एसी आणि नॉन एसी बस.
भाडे : ८०० ते २००० रुपये (बसच्या प्रकारानुसार).
मार्ग: दिल्ली → कानपूर → प्रयागराज → वाराणसी.
2. ट्रेनचा प्रवास
अंतर : सुमारे ७८० किलोमीटर
वेळ: 8-12 तास (ट्रेनच्या प्रकारावर अवलंबून).
प्रमुख गाड्या:
वंदे भारत एक्सप्रेस (8 तास)
काशी विश्वनाथ एक्सप्रेस (12 तास)
शिव गंगा एक्सप्रेस (10 तास)
भाडे : ३०० ते २५०० रुपये (स्लीपर टू एसी क्लास) .
स्थानक: नवी दिल्ली (एनडीएएलएस) ते वाराणसी जंक्शन (बीएसबी)।
3. विमान प्रवास
अंतर : हवाई मार्गाने सुमारे ६८० किलोमीटर.
वेळ: 1.5 तास (उड्डाण वेळ), एकूण वेळ सुमारे 3-4 तास.
भाडे : २००० ते ६००० रुपये (हंगामानुसार).
विमाने : इंडिगो, एअर इंडिया, स्पाइसजेट.
विमानतळ :
दिल्ली: इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (डीईएल)।
वाराणसी : लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ (व्हीएनएस)।
विमानतळ ते शहर : वाराणसी विमानतळापासून शहरापर्यंत टॅक्सी किंवा ऑटोने ४५ मिनिटे (२०-२५ किमी).