मुंबई : आपल्यापैकी अनेकजण झोप घालवण्यासाठी सातत्याने कॉफी पितात. काहींना तर उपाशी पोटी झोपेतून उठल्यानंतर गरम गरम कॉफी प्यायला आवडते. सकाळी झोपेतून उठल्यानंतर आळस जरी कमी होत असला, तरीही याचे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात (Side effects of drinking coffee).
एका रिसर्चनुसार, रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने तुमच्या शरीरात कोर्टिसोल हार्मोनची वाढ होते. कोर्टिसोल हार्मोन आपल्या शरीरात मेटाबॉलिज्म, इम्यून सिस्टम आणि स्ट्रेसचे व्यवस्थापन करण्यास मदत करते. त्यामुळे जर, या हार्मोनची वाढ झाली तर त्याचे शरीरात वाईट परिणाम होऊ शकतात.
सकाळी उठल्यानंतर कॉफी पिणाऱ्या अनेकांमध्ये मूड स्विंग किंवा तणावाचे प्रमाण जास्त असते. मात्र जे लोक रिकाम्या पोटी कॉफी पित नाहीत, त्यांच्यात तणावाचे प्रमाण फार कमी असते. विशेष म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिणाऱ्या लोक सर्वाधिक तणावग्रस्त असतात.
कॉफीमध्ये भरपूर कॅफिन असते, जे आपल्या आरोग्यास अतिशय हानिकारक आहे. जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन आपल्या झोपेवर परिणाम करते. कॉफी पिण्यामुळे इनोसॅमिनियाचा धोका वाढू शकतो. हे बर्याच संशोधनात सिद्ध झाले आहे. याशिवाय झोपेच्या आधी कॉफी पिणे कटाक्षाने टाळले पाहिजे.
कॉफी पिण्यामुळे वारंवार लघवी होण्याची समस्या निर्माण होते. कॉफीमध्ये असलेले कॅफिन आपल्या मूत्रपिंडासाठी हानिकारक आहे. कॉफीमध्ये आढळणारे ऑक्सॅलेट्स रक्तातील कॅल्शियमबरोबर मिसळून कॅल्शियम ऑक्सलेट तयार करतात, जे मूत्रपिंडातील खड्यांचे अर्थात ‘किडनी स्टोन’च्या समस्येचे मुख्य कारण असू शकते (Side effects of drinking coffee).
जास्त प्रमाणात कॉफीचे सेवन आपल्या पाचन तंत्रावर गंभीर परिणाम करते. कॅफिनमुळे बर्याच लोकांना बद्धकोष्ठता आणि पोट फुगण्याची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून कॉफीऐवजी हर्बल चहा किंवा ग्रीन टी पिऊ शकता.
संशोधनानुसार जास्त प्रमाणात कॅफिनचा वापर रक्तदाब वाढवण्याचे काम करतो. तथापि, ही समस्या तात्पुरत्या स्वरुपाची असते. मात्र, याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
कॉफी पिण्याने आपल्याला काही काळ ऊर्जा मिळेल. परंतु, झोपेच्या कमतरतेमुळे दिवसभराचा थकवा जाणवू शकतो. चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे ‘कॅफिन’ या उत्तेजक द्रव्यामुळे झोप कमी होते. यामुळे अशक्तपणाची समस्या निर्माण होते.
(Side effects of drinking coffee)
Coffee | कॅपेचिनो-लाटे-मॅकियाटो-अमेरिकानो, कॉफीचे प्रकार आणि बरंच काही…https://t.co/fgldK3OMqD#coffee #TypesOfCoffe #food
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 10, 2020