मुंबई : लोक आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करतात. परंतु, आपल्या खाण्याच्या सवयी, वातावरण आणि शरीरात होणारे बदल त्वचेवरही परिणाम करतात, हे आपण लक्षात घेतच नाही. यामुळेच आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स अर्थात मुरूमं येतात. त्यातही ‘ब्लाइंड पिंपल्स’ सर्वात त्रासदायक असतात (Skin Care tips for blind pimple).
हे एक अशा प्रकारचे मुरुम आहे, जे त्वचेच्या पृष्ठभागाच्या खाली असते. त्यामुळे ते चेहऱ्यावर मुळीच दिसत नाहीत, म्हणूनच त्यांना ‘ब्लाइंड पिंपल्स’ म्हणतात. मात्र, या समस्येपासून मुक्त होणे खूप अवघड आहे. परंतु, काही उपाययोजना केल्यास आपण शक्य तितक्या लवकर या समस्येतून मुक्त होऊ शकता. आपणही अशा समस्येने त्रस्त असाल तर, आम्ही आपल्याला असे काही सोपे उपाय सांगणार आहोत, ज्याने आपल्याला आराम मिळेल.
ब्लाइंड पिंपल्स सेबम, बॅक्टेरिया आणि घाण आपल्या रोम छिद्रांमध्ये एकत्र अडकतात, ज्यामुळे आपल्या त्वचेखालील छोटी गाठ तयार होते. ही छोटीशी गाठ खूप दुखते. हे सामान्य मुरुमांसारखे दिसत नाही, परंतु जेव्हा आपण त्यांना स्पर्श करता तेव्हा ते खूप दुखवते.
अशा मुरुमांना नेहमीच दाबणे किंवा फोडणे टाळा. त्यांना कधीही फोडण्याचा प्रयत्न करू नका. ते त्वचेच्या पृष्ठभागावर दिसत नसले तरी, नाहीत, त्यांना हात लावणे देखील धोकादायक असू शकते.
या मुरुमांच्या समस्येतून मुक्त होण्यासाठी, त्यांना गरम शेक द्या. यामुळे वेदना कमी होतात. तसेच ही पद्धत मुरूमं येण्यास प्रतिबंधित करते. दिवसातून तीन किंवा चार वेळा आपण या उपायाचा वापर करू शकता. हे मुरुमांची समस्या बरे करण्यास, तसेच मुरुम काढून टाकण्यास मदत करते (Skin Care tips for blind pimple).
या मुरुमांच्या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी आपण पिंपल स्टिकर देखील वापरू शकता. हे एखाद्या चिकटपट्टी प्रमाणे दिसते, जे आपण अशा मुरुमांवर लावू शकता.
अँटीबायोटिक्स कोणत्याही प्रकारच्या जीवाणूपासून मुक्त होण्यास मदत करतात. ते अशा मुरुमांमध्ये येणारी सूज देखील कमी करतात. क्लिंडामाइसिन आणि एरिथ्रोमाइसिन हे अँटीबायोटिक्स अशा मुरुमांसाठी वापरले जातात. दिवसातून दोन वेळा अँटीबायोटिक्स घेण्याचा सल्ला दिला जातो.
हा एक नैसर्गिक पर्याय आहे. यामध्ये बॅक्टेरिया नष्ट आणि प्रतिबंधित करण्याचे गुणधर्म आहेत. ‘ब्लाइंड पिंपल्स’वर रात्रभर थोडा शुद्ध मध लावा. तसेच तो पाण्यात मिसळून आपण क्लीन्झर म्हणून देखील वापर करू शकता. जर आपल्याला या उपायांनी आराम मिळाला नाही, तर त्वरीत त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
(Skin Care tips for blind pimple)
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
Face Cure | चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्समुळे तुम्ही त्रस्त आहात? तर ही खास बातमी तुमच्यासाठी!https://t.co/k4sYnFZyct #facecure #pimples
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 27, 2020