Skin Care Tips | त्वचेची नैसर्गिक चमक परत हवीय? मग, आहारात सामील करा ‘हे’ पदार्थ

| Updated on: Feb 14, 2021 | 3:49 PM

अगदी लहान वयातच काही लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. बदलत्या हंगामात, थंड वातावरणामुळे चेहऱ्यावर रुक्षपणा वाढल्यामुळे अनेक अडचणी उद्भवतात.

Skin Care Tips | त्वचेची नैसर्गिक चमक परत हवीय? मग, आहारात सामील करा ‘हे’ पदार्थ
चमकदार त्वचा
Follow us on

मुंबई : आपल्यातील बरेच लोक असे आहेत ज्यांचे शरीर तरुण दिसत आहे, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर चमक दिसत नाही. याशिवाय अगदी लहान वयातच काही लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. बदलत्या हंगामात, थंड वातावरणामुळे चेहऱ्यावर रुक्षपणा वाढल्यामुळे अनेक अडचणी उद्भवतात. अशा परिस्थितीत, हिवाळ्यात आपण आपल्या आहारात काही खास फळांचा आणि पदार्थांचा समावेश केला पाहिजे (Skin Care Tips for natural glowing skin).

दही

दह्यापासून बनवलेले रायते किंवा लस्सी आपली पचन क्रिया योग्य ठेवते. तांदळाचे पीठ किंवा बेसन पीठ दह्यात मिसळून त्याचा मास्क चेहऱ्यावर लावल्याने अनेक फायदे मिळतील. यामुळे आपल्या त्वचेवरील डार्क स्पॉट्स देखील दूर होतील.

लिंबू

लिंबाचा रस केवळ आपल्या पोटासाठीच नव्हे, तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. दररोज लिंबाचे पाणी पिण्यामुळे आपल्याला पोटातील समस्यांपासून मुक्तता मिळते. तसेच, आपण चेहऱ्यावर साध्या पाण्यात किंवा ग्लिसरीनमध्ये मिसळलेल्या लिंबाचा रस लावू शकता. याने त्वचा चमकदार बनेल.

टरबूज / कलिंगड

आपल्यापैकी बहुतेक लोकांना टरबूज किंवा कलिंगड हे फळ खायला आवडते. याने आपल्या शरीराला आतून गारवा मिळतो. या बरोबरच टरबूज किंवा कलिंगड खाण्याशिवाय तुम्ही त्याचा रस चेहऱ्यावरही लावू शकता. याने त्वचेला गारवा मिळेल आणि पोषक घटकही मिळतील (Skin Care Tips for natural glowing skin).

दूध

दूधाला संपूर्ण अन्न म्हणतात, हे आपल्याला सर्वांनाच ठावूक आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण दररोज किमान दोन ग्लास दूध प्यायलेच पाहिजे. आपण सकाळी आणि रात्री एक ग्लास दूध पिऊ शकता. तुम्ही कच्चे दूध म्हणजे न उकळले दूध चेहऱ्यालादेखील लावू शकता.

सफरचंद

आपण आपल्या दररोजच्या जेवणात नियमितपणे एक सफरचंद समाविष्ट केला पाहिजे. तसेच, आपण सफरचंद किसून त्याचा रस आपल्या चेहऱ्यावर लावू शकता. सफरचंद व्हिनेगर देखील बाजारात विकत मिळते, जो चेहऱ्यासाठी खूप चांगला आहे.

आहारातही बदल आवश्यक!

जर खरोखरच आपण आपल्याला चेहऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवायचा प्रयत्न करत असाल, तर प्रथम आपल्या खाण्याच्या सवयीत सुधारणा करणे आवश्यक आहे. केवळ या सवयी बदलल्यानंतरच, कोणताही घरगुती उपचार आपल्या त्वचेवर प्रभावी ठरू शकतो. यासाठी बाहेरील खाद्यपदार्थ, जंकफूड आणि फास्टफूड खाणे शक्यतो टाळा. चहाऐवजी अँटीऑक्सिडंटनी समृद्ध ग्रीन टी पिण्यास सुरुवात करा. हे अँटीऑक्सिडंट चेहरा आणि त्वचा उजळ करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. याशिवाय हिरव्या भाज्या आणि हंगामी फळे भरपूर प्रमाणात सेवन करा. मोड आलेले कडधान्य खा आणि भरपूर पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतील.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

(Skin Care Tips for natural glowing skin)

हेही वाचा :