मुंबई : चमकदार आणि नितळ त्वचा आपल्यापैकी प्रत्येकालाच हवी असते. परंतु, बदलती जीवनशैली, अयोग्य आहार आणि प्रदूषणाचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतो. या सर्व गोष्टींमुळे आपल्या चेहऱ्यावर काळे डाग पडतात. हे डार्क स्पॉट्स अर्थात काळे डाग काढून टाकण्यासाठी बर्याच प्रकारची उत्पादने बाजारात येतात. परंतु, ही उत्पादने किती प्रभावी आहेत, हे आपल्या त्वचेच्या प्रकारावर अवलंबून असते (Skin Care tips to reduce dark spots on face).
जर, त्वचेमध्ये मेलेनिनचे प्रमाण जास्त असेल तर, त्वचेवर डाग पडण्याची शक्यता अधिक असते. जर आपल्याला बाजाराच्या कॉस्मेटिक उत्पादनांमधून काही लाभ मिळत नसेल, तर आपण काही घरगुती उपायांचा अवलंब करु शकता. काही सोपे घरगुती उपाय वापरून आपण आपल्या त्वचेच्या समस्येवर सहजपणे विजय मिळवू शकतो.
पपई हे एक नैसर्गिक एक्सफोलीएट आहे जे अँटी-एजिंगचे काम करते. एक्सफोलीएटिंग प्रक्रिया आपली मृत त्वचा काढून टाकते आणि त्वचेला आतून निरोगी बनवते. एक्सफोलिएशनसाठी कच्चा पपई एका भांड्यात स्मॅश करून घ्या आणि हा कुस्करलेला गर चेहऱ्यावर मास्क म्हणून लावा. हा पपईचा फेस मास्क वाळवल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. पपईचे वैशिष्ट्य म्हणजे तो कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल.
आरोग्यासह त्वचेसाठीही हळद खूप फायदेशीर आहे. हळदीमध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते. हळद आणि मध यांचा फेस मास्क चेहर्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी वापरता येतो. हा फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात 2 चमचे हळद, 1 चमचा मध आणि लिंबाचा रस घ्या. हे मिश्रण व्यवस्थित मिसळून त्याची पेस्ट तयार करा. 5 ते 20 मिनिटांसाठी हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. जर आपली त्वचा संवेदनशील असेल तर, लिंबाचा रस मिसळू नका (Skin Care tips to reduce dark spots on face).
कोरफड जेल आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कोरफडमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे त्वचेवरील गडद काळे डाग दूर करण्यास मदत करतात. आपण कोरफड जेल थेट कोरफड वनस्पतीमधून काढून चेहऱ्यावर लावू शकतो. याशिवाय तुम्ही कोरफड जेलचा फेसमास्क देखील लावू शकता.
चेहर्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी टोमॅटोइतका चांगला दुसरा घटक नाही. टोमॅटो लाइकोपीनने समृद्ध असतो, जो त्वचेसाठी सनस्क्रीन प्रमाणे काम करतो. यासाठी एका भांड्यात टोमॅटोचा कुस्कुरून त्यात लिंबाचा रस मिसळा. या पेस्टने चेहऱ्यावर गोलाकार मोशनमध्ये मसाज करा.
बदामांमध्ये व्हिटामिन ई भरपूर प्रमाणात असते. बदाम तेल चेहऱ्यावरील काळे डाग दूर करून, रंग उजळण्यास मदत करेल. दररोज रात्री बदामाच्या तेलाने चेहऱ्यावर मसाज करा. हळूहळू, आपला रंग देखील उजळेल आणि त्वचा चमकू लागेल.
(Skin Care tips to reduce dark spots on face)
Hair Care | थंडीच्या दिवसांत रुक्ष केसांच्या समस्येमुळे हैराण? मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा!https://t.co/R06JFAcxU4#HairMask #HairCare #beautytips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020