नवी दिल्ली – चंदन त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी चंदन गुणकारी ठरते. तसेच मुरुमे आणि डाग यांपासूनही मुक्ती मिळते. चंदनामध्ये अँटी ऑक्सिडेंट, अँटी सेप्टिक तसेच अँटी बॅक्टेरिअल (anti-bacterial)गुणधर्म असतात. तसेच अँटी-इन्फ्लेमेटरी म्हणजेच दाहक-विरोधी (anti-inflammatory)गुणधर्म आहेत. त्यामुळे मुरुमांच्या वेदना आणि जळजळ कमी होते. चंदनाच्या वापराने तुमच्या चेहऱ्यावरील छिद्र खोलवर स्वच्छ होतात. त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. तसेच चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलावर नियंत्रण ठेवण्यासाठी चंदन (sandalwood) मदत करते. मुरुम दूर करण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारे चंदनाचा वापर करू शकता.
चंदन आणि गुलाबजल फेसपॅक
एका भांड्यात 1 ते 2 चमचे चंदन पावडर घ्या. त्यात गुलाबजाचे काही थेंब टाका. या दोन्ही गोष्टी मिक्स करा. आता ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. थोडा वेळ तशीच राहू द्या. यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.
चंदन आणि हळद फेस पॅक
यासाठी एका बाऊलमध्ये 1 ते 2 चमचे चंदन पावडर घ्या. त्यात चिमूटभर हळद घाला. नंतर त्यामध्ये थोडं पाणी घालून मिक्स करा व चेहरा आणि मानेला लावा. 10 ते 15 मिनिटे तसेच राहू द्या. वाळल्यानंतर तेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.
चंदन आणि कोरफड
एका भांड्यात 1 ते 2 चमचे चंदन पावडर आणि कोरफड जेल मिसळून एकजीव करा. हा पॅक चेहऱ्यावर आणि मानेला लावून ठेवा. 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता. कोरफडीमधील अनेक औषधी गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर ठरतात तर चंदनाच्या वापराने त्वचा उजळते.
चंदन, लिंबाचा रस आणि मधाचा फेसपॅक
एका बाऊलमध्ये 1 ते 2 चमचे चंदन पावडर घ्या. त्यात लिंबाचा रस आणि मधाचे काही थेंब टाकावेत. या सर्व गोष्टी मिसळून चेहरा व मानेला लावा. 15 ते 20 मिनिटांनी तेहपा स्वच्छ धुवा आणि पुसून कोरडा करा. हा पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.