सध्याच्या तरुणांमध्ये एक ट्रेंड दिसत आहे. तो म्हणजे लग्न करायचं आणि घटस्फोट घ्यायचा. अवघ्या काही महिने आणि वर्षातच तरुणांची लग्न तुटण्याचे प्रकार वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. एकमेकांना वेळ न देणं, एकमेकांत संवाद नसणे, ताळमेळ नसणे आणि एकमेकांना समजून न घेणं या सर्व गोष्टीमुळे पती-पत्नीमध्ये अंतर निर्माण होत आहे. त्यामुळे प्रकरण घटस्फोटापर्यंत जात आहे. सध्या तर आजच्या तरुणांनी ‘स्लीप डिव्होर्स’ घ्यायला सुरुवात केली आहे. या ‘स्लीप डिव्होर्स’चा ट्रेंड सध्या तरुणाईमध्ये वाढताना दिसत आहे. या ट्रेंडमध्ये, कपल्स एकाच घरात राहतात, परंतु वेगवेगळ्या खोलीत झोपतात. दोघं रात्री एकत्र झोपण्याऐवजी वेगवेगळ्या खोलीत झोपण्याचा निर्णय घेतात. परंतु, ते हे का करतात? या मागचं लॉजिक काय?
तरुणांचं पहिलं लक्ष्य करिअर असतं. करिअर चांगलं करणं, त्यात यशस्वी होणं याकडेच त्यांचं लक्ष असतं. हे तरुण कामाला अधिक महत्त्व देतात, त्यांची वैयक्तिक जीवनं आणि त्यांचे जोडीदारांशीचे नातेसंबंध ताणले जातात. याशिवाय काही इतर कारणेही असू शकतात, जोडीदाराच्या घोरण्याची समस्या, रात्री उशिरापर्यंत जागरणाची सवय, खोलीत प्रकाश ठेवण्याची सवय, इत्यादी. या सवयींमुळेही जोडीदारांमध्ये अंतर निर्माण होऊ शकते.
स्लीप डिव्होर्समुळे संबंधावर परिणाम होतो. स्लीप डिव्होर्समुळे नात्यात अंतर येऊ शकतं, असा लोकांचा विश्वास असतो. परंतु, यामुळे संबंध अधिक मजबूत होतो, असं या दाम्पत्यांना वाटत असतं. जेव्हा ते चांगल्या झोपेतून उठतात, तेव्हा ते अधिक सकारात्मक आणि आनंदी असतात. यामुळे त्यांच्यात संवाद आणि समज वाढते.
चांगली झोप :
वेगवेगळ्या खोलीत झोपल्यामुळे दोघांना एकमेकांना त्रास न देता चांगली झोप मिळते. त्यामुळे त्यांना दिवसभर ऊर्जा आणि उत्पादकतेत वाढ होते.
कमी ताण :
चांगली झोप न घेतल्यामुळे शरीरात अनेक आजार निर्माण होऊ शकतात. ताणतणाव त्यापैकी एक आहे. ताणतणाव वैवाहिक आयुष्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे स्लीप डिव्होर्स पद्धतीचा वापर करून ताण कमी होऊ शकतो आणि संबंध सुधारू शकतात.
चांगला संवाद :
जेव्हा दोन्ही भागीदार चांगल्या प्रकारे आराम करतात, तेव्हा ते एकमेकांसोबत अधिक चांगले संवाद साधू शकतात आणि एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात.
कमी वेळ एकत्र घालवणे :
कमी वेळ एकत्र आल्याने नातं अधिक मजबूत होऊ शकतं. त्यामुळे त्यांचा वेळ कमी होतो.
भावनिक अंतर :
वेगवेगळ्या खोलीत झोपल्यामुळे भावनिक अंतर वाढू शकतं, असा काही लोकांचा विश्वास आहे.