मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या फॅशन सेन्स बद्दल सर्वांनाच माहिती आहे. ती बर्याचदा तिच्या हटके स्टाईलमुळे चर्चेत असते. सोनम तिच्या केसांची आणि त्वचेची विशेष काळजी घेते. गेले काही दिवस ती आपल्या स्किनकेअर आणि हेअर केअर संबंधित गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच सोनम कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने केसांची काळजी कशी घ्यावी, याबद्दल खास टिप्स दिल्या आहेत (Sonam Kapoor share Hair Care tips on social media).
व्हिडीओ पोस्ट करताना सोनमने लिहिले की, ‘सौंदर्य म्हणजे जेव्हा तुम्ही केवळ बाहेरूनच नाही तर आतूनही सुंदर असता. म्हणूनच मी माझ्या केसांना आतून पोषण देण्यावर विश्वास ठेवतो. मी येथे काही टिप्स आणि युक्त्या सामायिक करत आहे, ज्या मी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केल्यावर वापरण्यास सुरुवात केली.’
सोनम आपल्या केसांचे पोषण करण्यासाठी फक्त एक तेलच नाही, तर बऱ्याच तेलांचे मिश्रण आपल्या केसांना आणि स्काल्पवर लावते. तिने आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये सांगितले की, ‘मी केसांसाठी बदाम तेल, नारळ तेल आणि कधीकधी व्हिटामिन-ई तेल या तेलांचे मिश्रण वापरते. मी हे मिश्रण माझ्या केसांच्या मुळांवर आणि टोकांवर लावून मसाज करते. मी माझ्या केसांसाठी हीट प्रोटेक्शन सीरम देखील वापरते, ज्यामुळे माझे केस खराब होत नाहीत.’
(Sonam Kapoor share Hair Care tips on social media)
आठवड्यातून किमान दोनवेळा आपण नियमितपणे आपले केस धुवावेत. यामुळे केस आणि स्काल्पमध्ये जमा होणारी घाण निघून जाईल. जर आपले केस अधिक तेलकट असतील, तर आपण दररोज आपले केस धुतले पाहिजेत.
घाई घाईत आपण ड्रायरची हिट वापरून केस कोरडे करता, ज्यामुळे केस कमकुवत होतात. ओल्या केसांना कोरड्या टॉवेलने किंवा मोकळ्या हवेत वाळवा. ओले केस कधीच कंगवा वापरून विंचरू नका. केस चांगले कोरडे झाल्यावर त्यावर तेल लावा आणि मसाज करा.
आपण पुरेसे पाणी प्यायल्यास यामुळे उद्भवणाऱ्या अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवत नाहीत. जर आपण पाण्याचे सेवन कमी केले तर आपले केस कमकुवत आणि कोरडे होतील. यासाठी, आपण दिवसभर किमान 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Sonam Kapoor share Hair Care tips on social media)
ऐन पंचविशीतच केस पांढरे होतायत? ‘या’ नैसर्गिक रंगांनी मिळेल केसांना पोषण!https://t.co/G05u3KmbQN#GreyHair #NaturalHairColour #haircare
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 23, 2020