बेस्ट फ्रेंडमध्येच लपलीय ‘मतलबी गर्ल’; हे 8 संकेत काय सांगतात?

| Updated on: Nov 25, 2024 | 2:50 PM

तुमची बेस्ट फ्रेंड खरोखरच तुमची बेस्ट फ्रेंड आहे का? या लेखात आम्ही मतलबी मैत्रिणी ओळखण्याचे आठ महत्त्वाचे संकेत सांगत आहोत. सहकार्याचा अभाव, स्वार्थीपणा, सतत नाटकं, बॅकहँडेड कॉम्प्लिमेंट्स, मैत्रीत रस नसणे, यशावर जळणे, भावनिक ओझं लादणे आणि सतत टीका करणे ही काही प्रमुख लक्षणे आहेत. या संकेतांच्या मदतीने तुम्ही तुमच्या खऱ्या मित्रांना ओळखू शकाल.

बेस्ट फ्रेंडमध्येच लपलीय मतलबी गर्ल; हे 8 संकेत काय सांगतात?
Follow us on

अनेक वर्षापासूनची तुमची एखाद्या तरुणीशी मैत्री असू शकते. अशी मैत्रीण भेटल्यावर तिला कुठं ठेवू आणि कुठं नको असं होतं. तिच्यासोबत तास न् तास गप्पा होतात. सर्व गोष्टींचा एकदमच फडशा पाडला जातो. अनेक सिक्रेट गोष्टीही शेअर केल्या जातात. पण तुमची मैत्रीण तुमच्या सर्व गोष्टी तिला शेअर करेलच असं नाही. तुम्ही दोघी मैत्रीणी कितीही सख्या बहिणीसारख्या वागत असल्या तरी एक जण हातचं राखूनच बोलत असतो. कारण तिच्यात एक मतलबी मुलगी दडलेली असते. ही मतलबी मुलगी कशी ओळखायची हे तुम्ही काही संकेतातून ओळखू शकता.

सहकार्याची कमी

सर्वात चांगले मित्र नेहमी तुमच्यासोबत उभे राहतात. संकटाच्या काळात हेच मित्र तुमचे सपोर्ट सिस्टिम म्हणून काम करतात. तुमची मैत्रीण जर तुमची स्पोर्ट सिस्टिम बनत नसेल, तिच्यात सहकार्याची भावना नसेल तर ती तुमची कधीच चांगली मैत्रीण होऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही संकटात असाल, आजारी असाल, तेव्हा ते तुम्हाला मार्गदर्शन करतात, तुमची देखभाल करतात किंवा तुमच्या भल्याचा विचार करतात. तीच तुमची खरी मैत्रीण असू शकते

स्वार्थी स्वभाव

एक बोगस फ्रेंड नेहमीच त्याच्याच फायद्याचा विचार करत असतो. तो त्याच्या गरजा आणि इच्छांनाच प्राधान्य देत असतो. तुमच्या भावना त्याला महत्वाच्या नसतात. तुम्ही त्याला कुठे जाण्यास सांगितले तर तो त्याला नकार देतो. जबरदस्तीने पाठवल्यास तो नाकतोंड मुरडून जातो. अशा मित्र किंवा मैत्रीणचं वर्तन हे कधीच तुमच्या फेव्हरचं नसतं. अशा व्यक्ती नेहमीच स्वार्थी असतात.

सतत नाटकं करणं

अशा मैत्रिणीसोबत वेळ घालवणे त्रासदायक होऊ शकते. कारण ते नेहमीच लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात आणि नकारात्मक ऊर्जा पसरवतात. ते केवळ स्वतःचं कौतुक करतात आणि तुमच्या समस्यांवर सकारात्मक विचार करण्याऐवजी नेहमी नकारात्मक गोष्टी बोलतात. उदाहरणार्थ, “अशा प्रकारे केल्यास काहीतरी वाईट होईल” किंवा “त्या गोष्टीत काहीतरी नकारात्मक होईल” असं.

बॅकहॅंडेड कॉम्प्लिमेंट्स

तुमचं कौतुक करताना कुत्सितपणे हसणारी, तुम्हाला कमी लेखणारी व्यक्ती तुमची चांगली मैत्रीण होऊच शकत नाही. कारण ती तुमच्याशी प्रामाणिक नसते. तुमच्या यशाचं तिला कौतुक नसतं. फक्त बोलायचं म्हणून ती बोलत असते. अशी व्यक्ती इतरांच्या वाईट गोष्टी तुमच्यासमोर सांगत असेल तर तुमच्या पाठी तुमच्याबद्दलही ती तशीच वागत असेल, त्यामुळे अशा मैत्रिणीपासून सावध राहा.

मैत्रीत इंटरेस्ट नसणे

जर तुमची मैत्रीण कधीही तुमच्याशी मैत्री कायम ठेवण्याचा प्रयत्न करत नसेल तर तिला तुमच्यात इंटरेस्ट नाही असं समजून जा. तिला फक्त तुमचा उपयोग करायचा आहे. तुमच्याशी मैत्री पुढे न्यायची नाही असा त्याचा अर्थ होतो.

यशावर जळणे

खरे मित्र तुमच्या यशात आनंदी होतात. पण जर तुमची मैत्रीण तुमच्या यशावर जळत असेल किंवा तिला तुम्ही स्पर्धक वाटत असेल, तर हा धोक्याचा संकेत आहे. अशा मित्रांपासून त्वरित दूर होणे गरजेचे आहे, कारण त्यांना नुकसान होऊ शकते.

भावनिक ओझं लादणे

आपल्याला काही तरी मिळेल या हेतूनेच जर तुमची मैत्रीण तुमच्याशी बोलत असेल किंवा तुमच्यावर काही गोष्टी लादत असेल तर हे तुमच्या मैत्रीचे चिन्ह नाही. मैत्रीमध्ये संतुलन आवश्यक आहे.

फक्त टीकाटिप्पणी

कधी कधी तुमचे मित्र तुमच्या भल्यासाठी तुमच्यावर टीका करत असतील तर ते स्वीकारणं योग्य आहे. पण जर तुमची मैत्रीण तुमच्यावर कायम टीका करत असेल, तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी जज करत असेल, तर ती मैत्री खोटी आहे. ते तुमचा आदर कमी करू शकतात असा त्याचा अर्थ आहे.