मुंबई : कोरोना दिवसेंदिवस गंभीर आणि अधिक प्राणघातक होत चालला आहे आणि प्रत्येक वेळी स्वत:चा बचाव करण्यासाठी सरकार खबरदारीचे उपाय आणि सूचना जारी करीत आहे. या सर्वांमध्ये, ‘स्टीम इनहेलेशन’ (Steam Inhalation) म्हणजेच वाफ घेणे महत्त्वाचे आहे. डॉक्टर देखील रुग्णाला नियमितपणे वाफ घेण्याची शिफारस करतात. अनेक अभ्यासानुसार स्टीम इनहेलेशनमुळे कोरोनाचे परिणाम कमी होण्यास मदत होऊ शकते. बर्याच लोकांनी हा दावा फेटाळला आहे. तथापि, डॉक्टर अजूनही याची ‘उपाय’ म्हणून शिफारस करत आहेत (Steam Inhalation keep these things in mind while taking steam to prevent corona).
मात्र, बर्याच लोकांना योग्यरित्या स्टीम कसे घ्यावे हे माहित नसते. या दरम्यान भारत आणि परदेशात बरीच स्टीम घेताना अपघाताची प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यात ज्यात केवळ लहान मुलेच नव्हे तर मोठी माणसं देखील भाजली आहेत. म्हणून, स्टीम घेताना काही नियम पाळणे आवश्यक आहे. चला तर, स्टीमिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया…
स्टीम इनहेलेशनमुळे कोरोना विषाणूचा परिणाम कमी होण्यास मदत होऊ शकते. परंतु याने प्राणघातक विषाणूतून पूर्णपणे बरे होऊ शकत नाही. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) किंवा जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना टाळण्यासाठी स्टीम इनहेलेशनची शिफारस केलेली नाही.
कोरोनापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी, नियमितपणे हात धुणे, सार्वजनिक ठिकाणी अंतर ठेवणे आणि आवश्यकतेनुसार सॅनिटायझर वापरणे हे उत्तम मार्ग आहेत.
कोरोना विषाणूच्या या काळात, स्वतःचे रक्षण करणे फार महत्वाचे झाले आहे. त्याच्या प्रभावी उपचारांशिवाय आपल्याला स्वतःवर संयम ठेवून काम करावे लागेल आणि आपले मन संतुलित ठेवून त्याचे निदान करावे लागेल. लक्षात ठेवा की, कोरोना विषाणू आपल्या मनातून बाहेर येत नसेल, तर तो शरीरातून बाहेर पडण्यासाठीदेखील बराच काळ लागू शकतो. अशा परिस्थितीत, स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही पावले उचलणे चांगले आहे, मात्र, कोरोना विषाणूला आपल्या मनावर अधिराज्य गाजवू देऊ नका.
(Steam Inhalation keep these things in mind while taking steam to prevent corona)
Health Tips | कोरोना काळात घरीच राहून इम्युनिटी वाढवायचीय? मग ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा!
Immunity Booster Drinks | कोरोना काळात या ‘5’ पेयांनी वाढवा रोग प्रतिकारशक्ती! https://t.co/cme5t6mpKb #Coronavirus #immunityboostertips #HealthTips
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 24, 2021