फिटनेससाठी सूर्य नमस्कार किती महत्त्वाचे? ‘ही’ गोष्ट माहीत नसेल तर…

| Updated on: Jan 02, 2025 | 4:36 PM

सूर्य नमस्कार हे एक सोपे पण प्रभावी योगासन आहे जे शरीरासाठी अनेक फायदे देतो. रोजच्या धावपळीत वेळ नसल्या तरी, सूर्य नमस्कार केवळ काही मिनिटे घेतो पण सहनशक्ती वाढवतो, श्वासोच्छ्वास सुधारतो आणि हृदय व मणक्याच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. या लेखात सूर्य नमस्कार कसे करावे आणि त्याचे फायदे समजून घेऊया.

फिटनेससाठी सूर्य नमस्कार किती महत्त्वाचे? ही गोष्ट माहीत नसेल तर...
Follow us on

शरीर निरोगी असणं अत्यंत आवश्यक आहे. निरोगी आणि फिट बॉडीसाठी योग, वर्कआऊट करण्याची सल्ला दिली जाते. पण आजकालच्या धावपळीच्या जगात लोकांकडे तेवढा वेळ राहिला नाही. त्यामुळे त्यांना तास न् तास वर्कआऊट आणि योगा करण्यासाठी वेळच मिळत नाही. जर तुमच्याकडे वेळच नसेल तर तुम्ही रोज एक सूर्य नमस्कार करूनही स्वत:ला फिट ठेवू शकता. भलेही सूर्य नमस्कार करण्यासाठी काही वेळ लागतो. पण ते करण्याचे बरेच फायदे आहेत. सूर्य नमस्कार एक प्रकारचं सोपं आसन आहे.

सूर्य नमस्कार केल्याने त्याचा शरीरावर मोठा परिणाम होतो. सूर्य जीवन शक्ती आणी ऊर्जेचं स्त्रोत आहे. त्यामुळे सूर्य नमस्कार केल्याने शरीरासोबतच मेंदूलाही रिलिफ मिळतो. सूर्य नमस्कार कसा करायचा? त्यासाठीची काय काय तयारी आहे, हे आपण आज पाहणार आहोत.

फायदे काय?

2022मध्ये एक रिसर्च करण्यात आलं होतं. त्यातून काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या होत्या. रोज सूर्य नमस्कार केल्याने तुमची सहनशक्ती वाढते. सकाळी सकाळी तुम्ही सूर्य नमस्कार करताना श्वास आत घेता आणि बाहेर सोडता. त्यामुळे तुमची श्वसनाची क्षमता वाढते. हे आसन करताना एक असं पोस्चर बनतं त्यामुळे तुमच्या मणक्याची हड्डी मजबूत होते. त्याचा फायदा मिळतो. ज्यांचे खांदे वाकलेले असतात त्यांनाही हे आसन केल्याने फायदा होतो, असं हा अभ्यास सांगतो.

सूर्य नमस्कार केल्याने रक्ताभिसरणास चांगली मदत मिळते. असं केल्याने रक्ताला फ्लो मिळतो. त्यामुळे रक्त संपूर्ण शरीरात वेगाने आणि चांगल्या प्रकारे पोहचतं. तसेच सूर्य नमस्कारामुळे शरीरातील सर्व भागात ऑक्सिजनचा चांगला पुरवठा होतो. हे निरंतर केल्याने हार्ट, हात, पाय आणि पोटाच्या मांसपेशी चांगल्या होतात. सूर्य नमस्कार केल्याने कॅलरीजही कमी होतात. त्यामुळे तुमचं शरीर फिट राहतं. सूर्य नमस्कार एक प्रकारचं कार्डिओ आहे. त्यामुळे तुमचं शरीर निरोगी राहतं.

पद्धत काय?

सूर्योदयावेळी सूर्य नमस्कार केला पाहिजे. रिकाम्या पोटी आणि आरामदायक कपडे घालूनच सूर्य नमस्कार करा. हळूहळू तुमचे मसल्स खेचा आणि हातजोडून पोस्चर बनवा.

12 आसनांचं मिळून सूर्य नमस्कार बनलेला आहे. त्यासाठी सर्व आसने योग्य पद्धतीने केले पाहिजे. सर्व आसने एक एक करून करा. सर्वांचे पोस्चर योग्य असतील याची खात्री बाळगा.

सूर्य नमस्कार करताना श्वास आत घ्या. त्यानंतर बाहेर सोडा. असं करताना मणक्याची हड्डी सरळ ठेवा.

3-4 राऊंडपासून सुरुवात करा. हळूहळू माइंड फुलनेसवर ध्यान लावा. हे करताना तुमचं सर्व लक्ष तुमच्या मेंदूवर असलं पाहिजे.