मुंबई : यकृताची आपल्या शरीरात एक विशेष भूमिका असते. हे शरीरातील अन्न पचवण्यापासून पित्त बनविण्यापर्यंत कार्य करते. याशिवाय यकृत शरीरात प्रथिने बनविण्याचे, साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे आणि शरीरात डिटॉक्सिफाय करण्याचेही काम करते. त्यामुळे यकृत निरोगी राहणे खूप महत्वाचे आहे. जर यकृत निरोगी असेल तर आपले संपूर्ण शरीर योग्य प्रकारे कार्य करते. अशा काही पदार्थांबद्दल जाणून घ्या जे आपले यकृत निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत. (Take this six Foods That Can Keep Your Liver Healthy)
आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स तसेच व्हिटॅमिन सी असते. आवळ्याचे सेवन आपल्या यकृताचे कार्य सुधारते. आपण आवळ्याचे सेवन ज्यूस, चटणी, लोणचे किंवा मुरंब्याच्या स्वरुपात घेऊ शकता. याशिवाय फॅटी लिव्हरच्या समस्येमध्ये सुका आवळा खाल्ल्यास त्वरीत आराम मिळतो. हे शरीरातून विषारी घटक काढून टाकण्यासाठी कार्य करते.
लसूण हा यकृतातील सर्वात शक्तिशाली डिटोक्सपैकी एक मानला जातो. लसणामध्ये भरपूर प्रमाणात सेलेनियम समृद्ध असते जे यकृतास शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. दररोज सकाळी लसणाची पाकळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास बराच आराम मिळतो. हे फॅटी लिव्हरच्या समस्येमध्ये देखील फायदेशीर आहे.
हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, तसेच ते अँटीऑक्सिडंट्ससह समृद्ध असते. हळद यकृत बरे करण्यास मदत करते. पित्त मूत्राशयचे कार्य देखील दुरुस्त करते. हळदीमध्ये उपस्थित कर्क्यूमिन नावाचे रसायन या सर्वांमध्ये एक विशेष भूमिका बजावते. दररोज रात्री झोपताना हळद घालून दूध घेऊ शकता.
दररोज दुपारी जेवणासोबत ताक घेण्याची सवय लावा. ताकात हिंग, मीठ, भाजलेले जिरे आणि मिरपूड घालून प्या. यकृत दुरुस्त करण्याबरोबरच ताक आपल्या पोटातील पचन प्रणाली सुधारते. उन्हाळ्यात ताक घेणे हे वरदान असल्यासारखे आहे.
ग्रीन टी मध्ये अशी काही संयुगे असतात, जी यकृतातील जळजळ कमी करण्यासाठी आणि पाचन तंत्राला आराम देण्याचे काम करतात. म्हणून, यकृत निरोगी राहण्यासाठी, चहाऐवजी ग्रीन टीला आपल्या रुटीनचा भाग बनवा.
बीट हा एक अतिशय शक्तिशाली डिटॉक्स मानला जातो. तसेच खराब झालेले यकृत रिकव्हर करण्याची शक्ती देखील यात आहे. कोशिंबीर, ज्यूस किंवा सूपच्या स्वरुपात आपण आपल्या आहारात बीटचा समावेश करू शकता. (Take this six Foods That Can Keep Your Liver Healthy)
PHOTO | या फोटोंनी जिंकला नेचर फोटोग्राफी पुरस्कार 2021, पहा प्राणी आणि निसर्गाची अनोखी जुगलबंदीhttps://t.co/sT57L3FNST#Nature |#Photography |#Unique |#Juxtaposition
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 4, 2021
इतर बातम्या
‘पालिकेचे ग्लोबल टेंडर म्हणजे बिरबलाची खिचडी होती’, भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल