मुंबई : दात हा आपल्या शरीराचा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मात्र, अनेकदा स्वच्छ्तेच्या बाबतीत दुर्लक्षित राहणारा हा अवयव आहे. शारीरिक अस्वच्छतेमुळे किंवा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे होऊ दात पिवळे होऊ शकतात. काहींमध्ये धुम्रपानाच्या अतिसेवनामुळे, तर काहींमध्ये चहा-कॉफी-शीतपेये अतिप्रमाणात सेवन केल्यानेदेखील दात पिवळे होऊ शकतात (Teeth Whitening home remedies use these things to clean your teeth).
दात पिवळे असतील तर तुम्हालाही चारचौघात हसायला अगदी नकोसे होऊन जाते. हा दातांचा पिवळेपणा काढण्यासाठी आपण डेंटीस्टकडे जातो किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल्स आणि पेस्टचा आधार घेतो. मात्र, यातील रसायनांनमुळे आपल्या दातांची हानी देखील होऊ शकते. अशावेळी दातांचा हा पिवळेपणा दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील ट्राय करू शकता…
केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मॅगनीझ असते. हे घटक ब्लिचिंग एजंट असल्यामुळे आपल्या दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी केळ्याची साल उपयोगी पडते. म्हणून केळी खाल्ल्यानंतर त्याची साल न फेकता, ती साल आपण आपल्या दातांवर घासू शकता. आठवड्यातून किमान 2 वेळा हा उपाय केल्यामुळे तुमच्या दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होईल.
बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण तयार करुन, त्याची व्यवस्थित पेस्ट बनवा. ही पेस्ट टूथब्रशवर घेऊन, त्याने नेहमीप्रमाणे दात घासा. यामुळे केवळ काही मिनिटांतच आपले दात मोत्यासारखे चमकदार होतील.
दातांच्या कोणत्याही समस्येवर कडूलिंब हा सर्वोत्तम उपाय आहे. कडूलिंबमुळे दातांमधील किड, दातांचा पिवळेपणा आणि दातांच्या इतर समस्या कमी होण्यास मदत मिळते. कडूलिंबाचा पाला सुकवून त्याची पावडर करून त्याने दात घासा. हल्ली बाजारात तयार पूड देखील मिळते. याच्या नियमित वापराने दात पांढरे होतात.
बऱ्याचदा आपण टीव्हीवर किंवा इतर जाहिरातीत चारकोलच्या गुणांबद्दल ऐकले असेलच! चारकोल अर्थात कोळसा देखील दातांचा पिवळेपण दूर करण्यात फायदेशीर ठरतो. यासाठी बाजारात मिळणारी अॅक्टिव्हेटेड चारकोल पावडर घेऊन त्यानी दात स्वच्छ करू शकता. त्यामुळे तुमचे दात पांढरे दिसू लागतील (Teeth Whitening home remedies use these things to clean your teeth).
आपले दात चमकदार असावेत असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, कधीकधी आपण असे काही खातो, ज्यामुळे आपल्या दातांवर डाग पडतात आणि दात खराब दिसू लागतात. त्यामुळे शक्यतो या पदार्थांपासून दूर राहणेच अधिक फायदेशीर ठरते. यातील पहिला पदार्थ म्हणजे चहा. चहा पिणे आपल्यापैकी बऱ्याच जणांना आवडते. पण, दातांसाठी चहा चांगला मानला जात नाही. दातांचे बाह्य आवरण अर्थात इनेमलसाठी चहा अतिशय नुकसानदायी ठरतो. ज्यामुळे दात कमकुवत होतात आणि पिवळे पडतात. याशिवाय सोडा, कोला आणि इतर मद्य दातासाठी हानीकारक आहेत. या कार्बोनेटेड पेयांमधील रसायनांमुळे दातांचा बाह्य थर खराब होतो. आणि यामुळे दात पिवळे पडून कमकुवत होतात. कँडीज, सॉस, बेरीज या पदार्थांच्या सेवनाने देखील दातांवर डाग पडतात. तेव्हा, जर आपल्याला पांढरेशुभ्र दात हवे असतील, तर या पदार्थांपासून दूर राहिलेलेच चांगले!
(टीप : कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Teeth Whitening home remedies use these things to clean your teeth)
Skin Care | शिजवलेल्या तांदळापासून मिळेल चमकदार त्वचा, नक्की ट्राय करा ‘राईस’ फेसपॅक!
Weight Loss | डिलिव्हरीनंतर वाढलेलं वजन कमी करायचेय? मग, ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा!
सुपारी खाण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहेत का? https://t.co/KRel0I7IXd #Betelnut | #HealthTips | #Healthbenefits | #healthcare
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 4, 2021