IAS अधिकारी आणि श्रीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अतहर अमिर खान( Kashmiri IAS officer Athar Amir Khan) पुन्हा लग्न करणार आहेत. डॉक्टर मेहरीन काझी(Dr. Mehreen Qazi) यांच्याशी तिचा विवाह होत आहे. डॉ. मेहरीन काझी एक सोशल मीडिया ॲक्टिवीस्ट आणि अत्यंत स्टायलिश-फॅशनेबल छबी असलेल्या आहेत.
श्रीनगर महानगरपालिका आयुक्त तथा आयएएस अधिकारी अतहर अमिर खान (IAS officer Athar Amir Khan) पुन्हा विवाहबंधनात अडकणार आहेत. आयएएस अधीकारी आमीरने एंगेजमेंटचा फोटो शेअर करून लग्नाची माहिती दिली. अतहर अमीर सोबत ज्यांचा विवाह होणार आहे, त्यांचे नाव आहे डॉ. मेहरीन काझी (Dr. Mehreen Qazi). त्या श्री नगर येथील रहिवासी आहेत.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, अतहर सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे आणि त्याची भावी पत्नी डॉ. मेहरीन देखील सोशल मिडियावर ॲक्टीविस्ट असून त्यांच्या स्टाइलसमोर अभिनेत्रीही फिकी ठरेल अशा त्या आहे. डॉ. मेहरीन स्वतः चे खूप स्टायलिश फोटो सोशल मिडियावर शेअर करतात, ज्यामुळे त्यांचा स्टाइल आणि फॅशन सेन्स (Fashion sense) कळू सहज शकतो. डॉ. मेहरिन यांच्या स्टाईल आणि फॅशन बघून कुणीही त्यांच्याकडे आकर्षीत होऊ शकतो.
डॉ. मेहरिन प्रत्येक प्रकारच्या पेहरावात अतिशय सुंदर दिसत असल्या तरी, पारंपारिक पेहरावात त्यांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. या फोटोमध्ये त्यांनी डिझायनर लेहेंगा घातला आहे. या लेहंग्यावर सिल्व्हर जरी एम्ब्रॉयडरी आहे. डॉ. मेहरीनने हलक्या तपकिरी रंगाच्या लेहेंग्यासोबत मॅचिंग ज्वेलरीही घातली आहे. तिचे कानातले, नेकलेस, सोबर मेकअप आणि मोकळे केस यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.
एका फोटोमध्ये डॉक्टर मेहरिनने काश्मिरी सूट घातलेला आहे. लाल रंगाच्या सूटमध्ये त्या खूपच क्यूट दिसत आहे. लाल रंगाच्या सूटवर सोनेरी रंगाची डीझाईन आणि बॉर्डरने तिचा लुक उठून दिसतो. तिने या काश्मिरी सूटसोबत कोणतेही दागिने घातलेले नाहीत, हातात फक्त एक ब्रेसलेट आहे.
डॉ. मेहरिन प्रत्येक प्रकारच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसतात. पारंपारिक ड्रेसमध्ये त्या जितक्या सुंदर दिसतात, तितक्याच वेस्टर्न ड्रेसमध्येही त्यांचे सौंदर्य खुलून दिसते. या फोटोमध्ये त्यांनी पिवळ्या रंगाची पँट आणि ब्लेझर घातला आहे. काळी पर्स, चष्मा आणि मोकळे केसांनी त्यांचा लुक अधिकच उठून दिसतोय
कामाच्या ठिकाणी ऑफिस करिता डॉ. मेहरिनचा हा लुक खूपच सोबर आहे. या फोटोमध्ये त्यांनी पांढरा टी-शर्ट, काळ्या जीन्ससोबत गुलाबी रंगाचा ब्लेझर कॅरी केला आहे. काळी पिशवी आणि खुल्या केसांनी तिने या लूकला प्रोफेशनल लुक दिला आहे. ब्लॅक पर्सने तिच्या शैलीत अधिक भर घातली आहे.
या फोटोमध्ये डॉक्टर मेहरिनने यांनी नेव्ही-ब्लू रंगाचा प्लाझो सूट परिधान केला आहे. या सूटचे फॅब्रिक मखमली असून त्यावर सोनेरी जरीचे काम करण्यात आले आहे. त्यांनी त्यांचा हा लूक पारदर्शक दुपट्टा आणि गोल्डन जुतीने पूर्ण केला. या सूटसोबत कोणतेही दागिने घातलेले नाहीत.
डॉक्टर मेहरीन यांना प्रवासाची खूप आवड आहे, त्यामुळे नेहमीच प्रसंगानुसार कपडे घालायला त्यांना आवडतात. या फोटोत त्या इटलीत बोटीतून प्रवास करत आहेत. त्यांनी अतिशय सुंदर पोशाख घातला असून, जो प्रवास करणाऱ्या महिलांना नक्कीच आवडू शकतो. काळ्या रंगाच्या टी-शर्टसह ऑरेंज शेडच्या ट्राउझर्सने त्यांना अधिकच स्टायलिश लुक दिला आहे.