भारतातील टेम्पल सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘या’ राज्यात आहेत तब्बल इतकी मंदिरे!

| Updated on: Apr 09, 2023 | 11:11 PM

भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी त्यांच्या सौंदर्यामुळे आणि वेगळेपणामुळे प्रसिद्ध आहेत. तर तुम्हाला माहित आहे का एका राज्यातील हे शहर Temle City म्हणून ओळखलं जातं.

भारतातील टेम्पल सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या राज्यात आहेत तब्बल इतकी मंदिरे!
Follow us on

मुंबई : आपला देश प्रत्येक गोष्टीत समृद्ध आणि प्रगतशील आहे, मग शिक्षण असो संस्कृती असो की पर्यटन अशा प्रत्येक गोष्टीत आपला देश विकसित आहे. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी त्यांच्या सौंदर्यामुळे आणि वेगळेपणामुळे प्रसिद्ध आहेत. तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्रसिद्ध आणि अनोख्या ठिकाणाबद्दल सांगणार आहोत.

या प्रसिद्ध ठिकाण आहे ओडिशाची राजधानी भुवनेश्वर. भुवनेश्वरला टेम्पल सिटी म्हणून ओळखले जाते याचं कारण म्हणजे या शहरात 500 हून अधिक मंदिरे आहेत. म्हणून या शहराला टेम्पल सिटी म्हटलं जातं. विशेष म्हणजे भुवनेश्वरमध्ये सहाव्या आणि अकराव्या शतकातील मंदिरे बांधली गेली आहेत. त्यामुळे हे शहर आपल्या संस्कृतीसाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.

हे मंदिर युनेस्कोच्या यादीत समाविष्ट

भुवनेश्वरमधलं एक असं मंदिर आहे ज्याचा युनेस्कोच्या यादीत समावेश आहे. या मंदिराचे नाव आहे एकम्र क्षेत्र. या मंदिराची विशेषता म्हणजे हे मंदिर भुवनेश्वरची संस्कृती अधिक चांगल्या प्रकारे लोकांना समजावण्यास मदत करते. तसेच हे मंदिर अद्वितीय वास्तुकलेसाठीही ओळखले जाते. येथे तुम्हाला सहाव्या शतकातील प्राचीन अनेक हिंदू मंदिरे पाहायला मिळतील. त्यामुळे या मंदिराचा युनेस्कोच्या यादीत समावेश आहे.

येथील परिसर 10.73 चौरस किमी क्षेत्रफळात पसरलेला आहे. येथे हिंदू देवता शिवाला समर्पित असलेले प्रसिद्ध लिंगराज मंदिर आहे. तसेच येथील मंदिर परिसराला भेट देताना, तुम्हाला मुक्तेश्वर मंदिर, राजराणी मंदिर आणि अनंत वासुदेव मंदिर यासारखी इतर प्रमुख मंदिरे देखील पाहायला मिळतील.

हिंदू लोकांसाठी एकम्र क्षेत्र हे सर्वात महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी येथे हजारो भाविक  भेट देत असतात. येथील सर्व मंदिरे ओडिशाच्या इतिहासाचा आणि सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहेत. विशेष सांगायचं झालं तर येथील शिवरात्री, रथयात्रा आणि दुर्गापूजेदरम्यान या ठिकाणचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही भेट द्या, तेथे जाऊन तुम्ही नक्की मंत्रमुग्ध व्हाल.