Slim Body: म्हणून.. वाढत नाही सडपातळ व्यक्तींचे वजन? शास्त्रज्ञांनी शोधून काढले सडपातळ शरीराचे रहस्य!

| Updated on: Jul 21, 2022 | 9:37 PM

शरीरयष्टी कृश म्हणजेच सडपातळ असणाऱ्यांबद्दल अनेकदा असं म्हटलं जातं की ते...चालता फिरता काहीही खाऊ शकता कारण त्यांचे वजनच वाढत नाही. कीतीही खाल्ल तरी ते बारीकच दिसतात. पण, नुकत्याच झालेल्या एका संशोधनाने हा मुद्दा चुकीचा सिद्ध केला आहे.

Slim Body: म्हणून.. वाढत नाही सडपातळ व्यक्तींचे वजन? शास्त्रज्ञांनी शोधून काढले सडपातळ शरीराचे रहस्य!
Follow us on

अनेकांचा असा समज होता की, जे लोक सडपातळ (slender) आहेत ते जास्त शारीरिक हालचाली करतात किंवा जास्त चालतात. त्यामुळे ते काहीही खाऊ शकतात. मात्र नुकत्याच झालेल्या एका संशोधनात हे चुकीचे सिद्ध झाले आहे. संशोधकांना आढळून आले आहे की, दुबळे लोक इतर लोकांपेक्षा जास्त व्यायाम (more exercise) करत नाहीत, परंतु कमी खातात. कमी खाल्ल्याने त्यांचे वजन कमी राहते. या संशोधनात 150 अत्यंत पातळ लोकांचा सहभाग होता. शास्त्रज्ञांनी अभ्यासातून हा निष्कर्ष काढला आणि हे तथ्य वस्तुस्थितीनुसार बरोबर सिद्ध केले. अॅबरडीन विद्यापीठाने केलेल्या या संशोधनात 150 अत्यंत सडपातळ लोकांचा आहार आणि ऊर्जा (Diet and Energy) पातळी पाहिली आणि त्यांची तुलना 173 सामान्य लोकांशी करण्यात आली. जाणून घ्या, काय आहे संशोधन आणि बारीक लोकांचे रहस्य..

काय आढळले अभ्यासात

दोन आठवड्यांच्या अभ्यासात असे आढळून आले की, बारीक लोक 23 टक्के कमी शारीरिक हालचाली करतात आणि बसून जास्त वेळ घालवतात. याशिवाय त्यांनी सामान्य लोकांपेक्षा १२ टक्के कमी अन्न खाल्ले. परंतु असे आढळून आले की विश्रांती घेत असतानाही त्यांची चयापचय प्रक्रिया जलद होते. जे त्यांना सामान्य व्यक्तीपेक्षा निष्क्रिय असताना देखील अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत करते. अॅबरडीन विद्यापीठाच्या संशोधनाचे नेतृत्व करणारे प्रोफेसर जॉन स्पीकमन म्हणाले, “या अभ्यासाचे निष्कर्ष खरोखरच धक्कादायक आहेत. अनेकदा लोक दुबळे लोकांशी बोलतात तेव्हा ते त्यांना सांगतात की, ते त्यांना हवे ते खाऊ शकतात. पण आमच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की बारीक लोक जास्त शारीरिक हालचालींमुळे नाही तर कमी खाण्यामुळे सडपातळ होतात. ते, जे खातात ते सामान्य बॉडी मास इंडेक्स (BMI) श्रेणीतील लोकांपेक्षा खूपच कमी असते.”

अतिरीक्त हालचाल करीत नाही

सडपातळ लोक त्यांच्या 96 टक्के वेळ कोणतीही अतिरिक्त हालचाली करत नाहीत किंवा हलकी शारीरिक क्रिया करत नाहीत. पण जे, सामान्य लोकांच्या बॉडी मास इंडेक्स(BMI 21.5) पेक्षा जास्त आणि 25 पेक्षा कमी होता. संशोधकांना असे आढळून आले आहे की, जे लोक बारीक आहेत त्यांच्या बारीक असण्याचे कारण त्यांचे कमी अन्न आहे. म्हणजेच, ते कमी कॅलरी वापरतात, म्हणून ते सडपातळ असतात.

चयापचय वेगवान

संशोधकांनी असे सुचवले आहे की, दुबळ्या लोकांनी सामान्य वजनाच्या लोकांपेक्षा सरासरी 12 टक्के कमी खाल्ले. पण त्या लोकांनी बसूनही कॅलरीज बर्न केल्या. याचे कारण म्हणजे त्यांची चयापचय क्रिया सामान्य लोकांपेक्षा वेगवान असते. खरं तर, त्यांच्या शरीरातील चरबीच्या पातळीच्या आधारावर त्यांचे चयापचय अपेक्षेपेक्षा 22 टक्के जास्त होते. अतिरिक्त चयापचय थायरॉईड हार्मोन्सच्या उच्च पातळीशी संबंधित होते, ज्यामुळे लोकांना कमी भूक लागते आणि ते सडपातळ राहतात.

दररोज किती कॅलरीज घेतल्या पाहिजेत?

सामान्य प्रौढ महिलांनी दिवसाला 2,000 कॅलरीज आणि पुरुषांनी 2,500 कॅलरीज वापरल्या पाहिजेत. शरीराची विविध कार्ये करण्यासाठी, दिवसभर चालण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी किती ऊर्जेची आवश्यकता असते. यावर देखील हे अवलंबून असते. जे लोक भरपूर व्यायाम करतात त्यांना जास्त कॅलरी खाण्याची गरज असते. जर तुम्ही एका दिवसात बर्न केल्यापेक्षा जास्त कॅलरी खाल्ले तर तुम्ही लठ्ठ व्हाल. बर्न करण्यापेक्षा कमी कॅलरी खाल्ल्याने तुमचे वजन कमी होईल. प्रक्रिया केलेले आणि कार्बोहायड्रेट्स, साखर आणि मीठ जास्त असलेले अन्न ताजी फळे आणि भाज्यांपेक्षा जास्त कॅलरी असतात. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळावे.