Carrot Side Effects: तुम्हाला माहिती आहे का की, काही लोकांसाठी गाजर खाणे हानिकारक ठरू शकते? याचविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. गाजराचे फायदे आणि दुष्परिणाम असे दोन्ही देखील आहे, याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.
हिवाळा सुरू होताच बाजारात गाजरांची विक्री सुरू होते. हिवाळ्यात गाजरपराठे, लोणचे आणि भाज्या खाणे बहुतेकांना आवडते. गाजर खायला स्वादिष्ट तसेच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गाजर हे दृष्टी वाढविण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी प्रसिद्ध आहे. यात व्हिटॅमिन-ए, फायबर, बीटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे अनेक पोषक घटक असतात, जे आरोग्यास अनेक फायदे देतात.
तुम्हाला माहित आहे का की, काही लोकांनी गाजराचे सेवन करू नये. होय, गाजराचे सेवन देखील काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. गाजराचे जास्त सेवन केल्याने शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. चला तर मग गाजर कोणी खाऊ नये, याबद्दल डायटिफाईच्या आहारतज्ज्ञ अबर्ना मॅथिवनन यांच्याशी बोलूया.
मधुमेहाचे रुग्ण
मधुमेहाच्या रुग्णांनी गाजराचे जास्त सेवन करू नये. खरं तर त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. अशावेळी याचे जास्त सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. जर तुम्ही साखरेचे रुग्ण असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच त्याचे सेवन करा.
पोटाच्या समस्या
ज्यांना पोटाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी गाजराचे सेवन करू नये. खरं तर यात फायबरचं प्रमाण जास्त असतं, जे पचनासाठी चांगलं मानलं जातं. परंतु जास्त प्रमाणात फायबरचे सेवन केल्याने गॅस, बद्धकोष्ठता, अपचन आणि सूज येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
स्तनपान देणाऱ्या स्त्रिया
स्तनपान देणाऱ्या महिलांनी गाजराचे सेवन टाळावे. खरं तर याच्या सेवनाने दुधाची चव बदलू शकते, ज्यामुळे बाळाला दूध पिण्यास त्रास होऊ शकतो. याशिवाय गरोदरपणात जास्त गाजर खाल्ल्याने काही महिलांना त्रास होऊ शकतो. अशावेळी मर्यादित प्रमाणात त्याचे सेवन करावे.
कॅरोटीनेमियाचे प्रमाण वाढते
गाजराच्या अतिसेवनामुळे काही लोकांना कॅरोटीनेमियाची तक्रार होऊ शकते. खरं तर गाजरात बीटा कॅरोटीन असतं, जे शरीरात पोहोचतं आणि व्हिटॅमिन-एमध्ये रूपांतरित होतं. गाजराचे जास्त सेवन केल्याने शरीरातील कॅरोटीनचे प्रमाण लक्षणीय वाढते, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला कॅरोटीनेमियाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्वचेवर पिवळसरपणा दिसू लागतो.
अॅलर्जीची समस्या
गाजरखाल्ल्याने काही लोकांना अॅलर्जीची समस्या उद्भवू शकते. यामुळे त्यांना त्वचेवर खाज सुटणे, सूज येणे, घसा खवखवणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशावेळी ज्यांना गाजराची अॅलर्जी आहे त्यांनी त्याचे सेवन करू नये.