Tourism | बाहेर फिरायला जाणं, विविध , नव्या जागा बघणं कोणाला आवडत नाही. बरेच जण असे असतात, जे वर्षभरात एकदा किंवा त्यापेक्षाही अधिक वेळेसे बाहेर फिरायला जातात. पर्यटनामुळे मन तर प्रेश होतंच, पण नव्या जागा, तिथली संस्कृतीही पहायला मिळते, ज्ञानात भर पडते ती तर वेगळीच. देशातील आणि परदेशातील पर्यटन स्थळांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि पर्यटकांना या तात्विक स्थळांकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने पर्यटन दिवसही साजरा केला जातो. अनेक प्रसिद्ध धार्मिक, नैसर्गिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत, ज्यांची माहिती उपलब्ध झाल्यास पर्यटनाला आणखी चालना मिळू शकेल. भारतातही अशी विविध पर्यटन स्थले, फिरण्याच्या अनेक जागा आहे, जेथे फक्त देशातीलच नव्हे तर परदेशातील व्यक्तीही आकर्षित होता. त्या जागा कोणत्या, ते जाणून घेऊया.
वाराणसी
उत्तर भारतातील वाराणसी हे शहर जगप्रसिद्ध आहे. देशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांमध्ये या शहराचा समावेश होतो. वाराणसी या शहराचे हिंदूंसाठी धार्मिक महत्त्व आहे. मात्र येथे सर्वाधिक विदेशी पर्यटक दिसतात. वाराणसी हे धर्म आणि अध्यात्माचे केंद्र आहे. गंगा नदीच्या काठी वसलेल्या या शहरामध्ये, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले काशी विश्वनाथ धामही येथे आहे. काशीला ‘मंदिरांचे शहर’ असेही म्हणतात, कारण इथल्या प्रत्येक गल्लीत मंदिरे दिसतात.
आग्रा
जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य हे भारतात आहे. ते म्हणजे आग्र्यातील ताजमहाल, त्याला प्रेमाचं प्रतीक असेही संबोधलं जातं. युनेस्कोनेही त्याला आपल्या हेरिटेजमध्ये स्थान दिले आहे. ताजमहाल पाहण्यासाठी केवळ भारतीयच नव्हे, तर विदेशातून, दूरूनही अनेक पर्यटक येत असतात. ताजमहालचे सौंदर्य, त्याची ख्याती ही जगभरात पसरलेली आहे. पांढऱ्या संगमरवराने बनलेल्या या ताजमहालचे परदेशी पर्यटकांना प्रचंड आकर्षण आहे. ताजमहाल व्यतिरिक्त, ताज संग्रहालय, इतिमाद-उद-दौला, अकबराचा मकबरा आणि आग्रा येथील लाल किल्ला ही प्रसिद्ध ठिकाणे पाहण्यासाठी पर्यटक उत्सुक असतात.
जयपूर
राजस्थानमधील बहुतेक शहरे ही पर्यटनस्थळे आहेत. जयपूरपासून उदयपूरपर्यंत आणि जैसलमेरपासून अजमेरपर्यंत अनेक किल्ले, राजवाडे आणि धार्मिक स्थळे येथे आहेत, जे पाहण्यासाठी केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही हजारो लोक येतात. जयपूरमध्ये तुम्ही हवा महल, अंबर पॅलेस, सिटी पॅलेस, जंतर मंतर, नाहरगढ किल्ला आणि जयपूर किल्ला पाहू शकता. येथे भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा अद्भुत संगम अनुभवता येतो.
गोवा
भारतात सर्वाधिक परदेशी पर्यटक कुठे येतात, असं जर कोणी विचारलं तर त्याचं उत्तर आहे गोवा. सर्वाधिक पर्यटकांची गोव्याला प्रचंड पसंती असते. गोवा हे भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक आहे. गोव्याला देशाचं फन कॅपिटलही म्हणता येऊ शकतं. केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातील इतर, अनेक देशांतूनही अनेक पर्यटक, गोव्यात मजा, मस्ती करण्यासाठी, सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आवर्जून येतात. गोव्यातील बीचेस, नाईट पार्टी, क्रूज पार्टी अशा विविध गोष्टी, पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरत आहे.