नवी दिल्ली : बदलता ऋतू त्याच्यासोबत अनेक समस्या घेऊन येतो, त्यातील एक म्हणजे केस गळणे आणि केसांचा कोरडेपणा (hair fall and dry hair). अनेकदा केसांमध्ये आर्द्रतेची असेल तर त्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. ज्यामुळे कोंडा होतो तसेच केस गळण्याची समस्या उद्भवते. काहीवेळा केस इतके कोरडे होतात की तुम्हाला तुमचे केस नीट सावरणेही कठीण होऊन जाते. केसांना पुन्हा निरोगी बनवण्यासाठी अनेकजण महागडी उत्पादने (expensive products) वापरतात, पण तरीही केस नीट निरोगी होत नाहीत. केसांसाठी केवळ बाह्य उपचार महत्वाचे नसून शरीरातूनही पोषण मिळणे आवश्यक ठरते. काही पदार्थांचे सेवन केल्यास (food for good hair) केसांमधील आर्द्रता पुन्हा येते व केसांचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते.
पौष्टिक तत्वांची कमतरता कारणीभूत जबाबदार
केसांसाठी तुम्ही महागडी उत्पादने वापरत असाल, पण तुमचे केस चांगले आणि निरोगी नसतील तर मग या उत्पादनांचा उपयोग काय? खरंतर शरीरात पोषक तत्वांच्या कमतरता असेल तर त्यामुळे केस कमकुवत होऊ लागतात आणि केस तुटू लागतात. हे केस गळणे वाचवण्यासाठी केसांना अनुकूल पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.
केसांसाठी सुपरफूड्स कोणते ते जाणून घेऊया.
1) अंडी
शरीरात प्रथिनांच्या कमतरतेमुळे तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण होतात, त्यापैकी एक म्हणजे केस कमकुवत होणे. अंडी हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे, जो तुमच्या शरीरात केस आणि हाडे मजबूत करण्यासाठी काम करतो. फक्त अंडी खाऊनच नाही तर केसांना अंडी लावल्यानेही केसांची वाढ सुधारू शकता. केसांना अंडी लावल्याने केसांची आर्द्रता लॉक होते आणि केस पुन्हा निरोगी होतात.
2) ड्रायफ्रुटस
ड्रायफ्रुटस हे अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांचे निरोगी स्त्रोत आहेत. यामध्ये प्रथिनांपासून ते व्हिटॅमिन ई पर्यंत आवश्यक पोषक घटक असतात, जे आपले केस निरोगी ठेवण्यास मदत करतात. जर तुमचे केस कमकुवत असतील किंवा कोरडे राहतील तर तुम्ही मूठभर ड्रायफ्रुट्सचे सेवन करू शकता. काही दिवस त्यांचे सेवन केल्याने केसांची वाढ सुधारण्यास मदत होईल.
3) फळं
फळं ही अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समृद्ध स्रोत असतात. ताजी फळे तुम्हाला निरोगी बनवण्यात नेहमीच मदत करतात. केसांचा विचार केल्यास, तुम्हाला तुमच्या आहारात अँटिऑक्सिडंट्सने भरलेली फळे समाविष्ट करणे आवश्यक आहे. वास्तविक, हे अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स बाहेर काढण्यात मदत करतात, ज्यामुळे केस मजबूत तर होतातच पण केसांची चमकही परत येते. केसांमधील आर्द्रता वाढवण्याचे कामही फळे करतात.
4) हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्या या आरोग्यसाठी नेहमीच फायदेशीर ठरतात. पण अनेक लोकांना त्या खायला आवडत नाहीत. हिरव्या पालेभाज्या या लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आणि केसांमधील सीबम वाढवण्याचे देखील काम करतात, ज्यामुळे केसांची चमक आणि लांबी दोन्ही वाढते. पालक, कोबी या भाज्यांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता.