मुंबई : उन्हाळ्यात कांद्याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सफेद कांद्याचे सेवन केल्यास बरेच आजार बरे होतात. सफेद कांदा केवळ अन्नाची चवच वाढवत नाही, तर यात पुष्कळ पोषक तत्वे असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यात एंटी-इंफ्लेमेटरी, एंटी-एलर्जिक, अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म आहेत. याशिवाय सफेद कांद्यामध्ये फोलेट, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन ए, बी 6, बी-कॉम्प्लेक्स असतात. ही पोषक तत्वे अनेक रोगांपासून बचाव करण्यास मदत करतात. (These are the benefits of consuming white onions in summer)
सफेद कांद्यामध्ये सेलेनियम असते. हे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कार्य करते. म्हणूनच, आपण याचे सेवन करून रोग प्रतिकारशक्ती वाढवू शकता.
सफेद कांद्यामध्ये फायबर आणि प्रीबायोटिक्स असतात. त्यामुळे याचे सेवन केल्याने पोट निरोगी राहते. यामुळे तुमची पाचक प्रणालीही चांगली होते.
सफेद कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर कंपाऊंड आणि फ्लेव्होनॉईड अँटीऑक्सिडेंट असतात. ते कर्करोगाशी लढण्यास मदत करतात. यामुळे ट्युमरचा धोकाही कमी होतो.
सफेद कांद्याच्या सेवनाने ब्लड शुगर कमी होते. त्यात क्रोमियम आणि सल्फर असते. हे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते. हा कांदा मधुमेहाच्या रुग्णांना फायदेशीर ठरतो.
या कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम असते. हे हाडे मजबूत करण्यास मदत करते. तसेच हाडांमधील वेदना कमी करते.
सफेद कांद्याचे सेवन केल्यास केस मजबूत आणि चमकदार बनतात. यामुळे डोक्यातील कोंडा आणि केस गळण्याची समस्या देखील कमी होते.
सफेद कांद्यात बरेच अँटीऑक्सिडेंट असतात. ते ट्रायग्लिसरायड्सची पातळी कमी करतात. हे आपल्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते. हे तुमचे हृदय निरोगी ठेवतात.
सफेद कांद्याचे सेवन केल्यास स्टोनच्या समस्येपासून आराम मिळतो. सफेद कांद्याचा रस प्यायल्याने स्टोनच्या वेदना आणि स्टोनपासून त्वरीत आराम मिळतो.
घसा खवखवत असल्यास सफेद कांद्याचे सेवन केले जाते. मध किंवा गूळ घालून तुम्ही त्याचा रस घेऊ शकता. यासह घसा, सर्दी किंवा कफचा त्रास दूर होतो.
सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी सफेद कांद्याचा फायदा होऊ शकते. मोहरीच्या तेलात सफेद कांद्याचा रस मिसळून याने मालिश करू शकता. असे केल्याने आपल्याला सांध्यातील वेदनेपासून आराम मिळतो. (These are the benefits of consuming white onions in summer)
PHOTO | फुटबॉलच्या मैदानातून प्रेमाची सुरुवात, साडे 3 वर्ष रिलेशन, नंतर लग्न, क्रिकेटपटू नितीश राणाची लव्ह स्टोरीhttps://t.co/H7Dp5UWfH6#NitishRana #SaachiMarwah #IPL2021 #NitishRanaLoveStory
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 28, 2021
इतर बातम्या
मुंबई शहराला “युनेस्को क्रिएटिव्ह सिटी फॉर फिल्म”चा दर्जा, लोगोचे महापौरांच्या हस्ते अनावरण
Gold Price Today : सोने-चांदी पुन्हा एकदा स्वस्त, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याची किंमत