Treatment For Constipation : पोट झालं डब्बं ? हा आहार करेल बद्धकोष्ठतेचा त्रास दूर

| Updated on: Mar 31, 2023 | 10:17 AM

अनहेल्दी डाएट आणि खराब जीवनशैलीमुळे अनेक लोक आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. यामध्ये बद्धकोष्ठतासारख्या समस्यांचाही समावेश होतो.

Treatment For Constipation : पोट झालं डब्बं ? हा आहार करेल बद्धकोष्ठतेचा त्रास दूर
Image Credit source: freepik
Follow us on

नवी दिल्ली : खराब जीवनशैली आणि अस्वास्थ्यकर आहारामुळे (unhealthy food) आजकाल अनेक लोकांना पचनाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये बद्धकोष्ठता (constipation) , अपचन आणि सूज येणे इत्यादींचा समावेश होतो. यामुळे लोकांनाही खूप अस्वस्थ वाटते. अशा परिस्थितीत शारीरिक हालचालींसोबतच सकस आहार घेणेही खूप गरजेचे आहे. बरेच लोक हिरव्या भाज्या आणि फळे (vegetables and fruits) कमी खातात. पाणी पिण्याचे प्रमाणही (drinking less water) अतिशय कमी असते. यामुळे पचनसंस्थेची समस्या देखील उद्भवते.

या समस्यांना तोंड देण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. ते पदार्थ तुमचे मेटाबॉलिज्म बूस्ट करतात. त्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळते. तसेच अपचन आणि पोट फुगण्यापासूनही आराम मिळतो. अशा परिस्थितीत येथे काही आरोग्यदायी पदार्थ सांगण्यात आले आहेत. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही त्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.

ऑलिव्ह ऑईल

तुम्ही तुमच्या जेवणात ऑलिव्ह ऑईलचा वापर करू शकता. त्यात अँटीऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. ते पचनसंस्था मजबूत करतात. तसेच पोटाच्या समस्यांपासून आराम देतात. हे आतडे निरोगी ठेवण्याचे काम करते.

फायबर

तुम्ही आहारात फायबर युक्त फळांचाही समावेश करू शकता. यामध्ये द्राक्षे, ब्लॅकबेरी, रास्पबेरी, किवी, सफरचंद आणि नाशपाती यांचा समावेश आहे. हे बद्धकोष्ठता सारख्या पचनाच्यासमस्यांवर उपचार करण्यास मदत करतात. त्यामुळे आपलं पोट स्वच्छ होण्यासही मदत होते.

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये भरपूर फायबर असते. तसेच त्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात. हे बद्धकोष्ठतेच्या समस्येशी लढण्याचे काम करते. आणि पचनाच्या समस्यांना बळी पडण्यापासून प्रतिबंधित करते. त्यामुळे पोट साफ होते. ब्रोकोली तुम्ही सॅलड किंवा भाजी म्हणूनही खाऊ शकता. ब्रोकोलीचे सूपही खूप चविष्ट लागू शकते.

दही

दह्यात चांगले बॅक्टेरिया असतात. ते पचनसंस्था निरोगी ठेवतात. दही पोट थंड ठेवते. हे ब्लोटिंग, बद्धकोष्ठता आणि जुलाब टाळण्यासाठी काम करते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तुम्ही दही अनेक प्रकारे खाऊ शकता. स्मूदी बनवून दही घेऊ शकता. याशिवाय रायतामध्येही याचा समावेश करता येईल.