Brain Health : हे पदार्थ खाल तर मेंदू राहील तंदुरूस्त

| Updated on: Dec 17, 2022 | 4:17 PM

आपला मेंदू निरोगी व तीक्ष्ण ठेवण्यासाठी ओमेगा-3 फॅटी ॲसिडयुक्त पदार्थ खाल्ले पाहिजेत.

Brain Health : हे पदार्थ खाल तर मेंदू राहील तंदुरूस्त
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – ज्याप्रमाणे तंदुरुस्त व निरोगी राहण्यासाठी सकस आहाराची (healthy food) गरज असते, त्याचप्रमाणे मेंदूचे कार्यही (brain health) चांगले चालावे यासाठी पोषक तत्वांची आवश्यकता असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी ओमेगा-3 फॅटी ॲसिड असलेले पदार्थ खावेत. मेंदू निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या पदार्थांचा (food for brain) आहारात समावेश करावा हे जाणून घेऊया.

पूर्ण धान्य

पूर्ण धान्य खाल्ल्याने आपला मेंदू निरोगी राहतो. तज्ञांच्या मते, मेंदूची शक्ती मजबूत करण्यासाठी आहारात व्हिटॅमिन-ई युक्त पदार्थांचा समावेश करू शकता. संपूर्ण धान्यामध्ये पोषक तत्वांसोबत व्हिटॅमिन-ई देखील भरपूर प्रमाणात आढळते. आहारात ब्राऊन राइस, बार्ली, गहू, दलिया आणि तृणधान्ये यासारख्या पदार्थांचा समावेश करू शकता.

हे सुद्धा वाचा

फॅटी फिश

फॅटी माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिडचे प्रमाण खूप चांगले असते. हे तुमच्या मेंदूच्या पेशींचे नुकसान होण्यापासून देखील संरक्षण करते. याशिवाय मासे मेंदूला निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे निरोगी मेंदूसाठी मासे खावेत.

शेंगदाणे

हिवाळ्यात शेंगदाणे खायला सर्वांनाच आवडते. शेंगदाण्यात पोषक तत्व, अनसॅच्युरेटेड फॅट्स आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. त्यांचे सेवन केल्याने ऊर्जेची पातळी वाढवण्यासही मदत होते.

अंडी

अंड्यांचे सेवन करणे हे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. अंड्यांमध्ये व्हिटॅमिन-बी 6, व्हिटॅमिन-बी12 आणि फॉलिक ॲसिड मुबलक प्रमाणात आढळते. नियमितपणे अंडी खाणे मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले असते. तुम्ही नाश्त्यातही अंडी खाऊ शकता.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)