Hair Care Mistakes : केस गळणे (hair fall) ही एक सामान्य गोष्ट आहे, दररोज प्रत्येक व्यक्तीचे थोडेफार केस गळतातच. पण केस जेव्हा झपाट्याने गळू लागतात तेव्हा जास्त काळजी वाटते. तसं पहायला गेलं तर केस गळण्यामागे अनेक कारणे असू शकतात, परंतु कधीकधी आपणही आपल्याचे केसांचे शत्रू बनतो. केसांची काळजी घेण्याच्या (hair care mistakes) किंवा त्यांना स्टायलिश बनवण्याच्या प्रक्रियेत आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे केस गळती आणखीनच वाढते.
केसांना तेल लावणे, हेअर मास्क किंवा इतर गोष्टींचा वापर करून केसांना पोषण देणे किंवा ते चमकदार करणे चांगले आहे, परंतु केसांची काळजी घेतानाही अनेक गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तुमचेही केस वेगाने गळतात का ? केसांची काळजी घेताना तुम्हीही नकळत काही चुका करत आहात का? कोणत्या सामान्य चुकांमुळे केस गळणे आणखी वाढते, ते तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
या चुका तुम्हीही करता का ?
तज्ज्ञांच्या मते केसांची काळजी घेतानाही आपण दोन चुका करतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की काही लोक आठवड्यातून एकदाच केसांना शांपू करतात. शांपूकडे दुर्लक्ष करणे भारी ठरू शकते. टाळूवर घाण असेल तर त्यामुळे जास्त केस गळतात, असे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे ही चूक टाळा. नउन्हाळ्यात आठवड्यातून किमान तीनदा केस स्वच्छ धुणे आवश्यक आहे.
तसेच केसांना स्टायलिश बनवण्यासाठी तुम्ही कॅरोटीन घेत असाल तर केसगळती दुपटीने वाढू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कॅरोटीन ट्रीटमेंटमुळे केस काही काळ स्टायलिश आणि चमकदार होऊ शकतात. हे एक रासायनिक उपचार आहे ज्याचे परिणाम केवळ नकारात्मक असतात. तज्ञांचे म्हणणे आहे की त्याऐवजी आपण हेअर सप्लिमेंट्सचा वापर करू शकतो. त्यासाठी शरीरातील प्रथिनांचे प्रमाण वाढवावे.
तुम्हाला जाड, लांब आणि काळेभोर केस हवे असतील तर हेअर मास्क, तेल लावण्यासह अनेक गोष्टींचे रूटीन फॉलो करा. केसांना आठवड्यातून दोनदा तेल लावावे. याशिवाय, लिंबू, कोरफड किंवा दही यासारख्या घटकांपासून बनवलेले हेअर मास्क लावूनही तुम्ही केसांची नीट काळजी घेऊ शकता.