Year Ender: यंदा गूगलवर सर्वात जास्त सर्च झाली ‘या’ आजारांची माहिती !

| Updated on: Dec 10, 2022 | 2:25 PM

कोरोनापासून बचाव करण्यासाठीचे प्रश्न विचारून लोकांनी गूगलला अक्षरश: भंडावून सोडलं. कोविड 19शी संबंधित आजार आणि घरगुती उपाय याबद्दलही बरीच माहिती सर्च करण्यात आली.

Year Ender: यंदा गूगलवर सर्वात जास्त सर्च झाली या आजारांची माहिती !
Follow us on

नवी दिल्ली – मोबाईल आणि इंटरनेट (internet) हे आजकाल लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. गूगल या सर्च इंजिन शिवाय तर आपण आपल्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. गूगल नसते तर आपण काय केले असते, हा विचार कधी केला आहे का ? आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या समस्येचे, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गूगलवर (google) टायपिंग सुरू होते. जगातलं सर्वात मोठं सर्च इंजिन असणाऱ्या गूगलला माहीत नाही अशी एकही गोष्ट नाही. म्हणूनच कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये जेव्हा लोकं घरात होती, तेव्हा गूगलवर (google search) हजारो प्रश्न विचारण्यात आले होते.

कदाचित तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, पण कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रश्न विचारून लोकांनी गूगलला अक्षरश: भंडावून सोडलं. त्याशिवाय कोविड 19शी संबंधित आजार आणि घरगुती उपाय याबद्दलही बरीच माहिती सर्च करण्यात आली.

गूगलवर या आजारासंदर्भातील माहिती करण्यात आली सर्च –

हे सुद्धा वाचा

ऑक्सिजन वाढवण्याचा उपाय :

कोरोना काळात अनेक लोक ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यूमुखी पडत होते. त्यावेळी लोकांनी गूगल सर्च इंजिनवर ऑक्सिजन वाढवण्याच्या सर्व टिप्स अथवा उपाय शोधले होते.

तापावर उपाय :

कोरोनाच्या काळात लोकांनी तापासंदर्भातही बराच शोध घेतला. ताप दूर करण्यासाठी अनेक प्रकारचे घरगुती उपाय यावेळी गूगलवर शोधण्यात आले.

प्रतिकारशक्ती वाढवणे :

कोरोनाच्या काळात बहुतांश लोकांचा भर हा रोगप्रतिकारशक्तीव वाढवण्यावर होता. त्यामुळे कोरोना काळात लोकांनी इम्युनिटी बूस्टिंग म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी कोणते उपाय करावेत, काढा प्यावा यासंदर्भात माहिती सर्च केली.

घसा खवखवणे :

घशात कोणत्याही प्रकारची खवखव होणे, हे कोरोनाचे लक्षण असल्याचे अनेक डॉक्टरांनी सांगितले होते. कोविडच्या काळात लोक घसा खवखवणे, खोकला यासारख्या समस्यांशी लढत होते, त्यामुळे ते टाळण्यासाठी घरगुती उपायांबद्दल अधिक माहिती शोधण्यात आली.

दूध आणि हळद :

दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत, हे सर्वांनाचा माहीत आहे. तर हळद ही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि सर्दी खोकला आणि छातीतील कफ यापासून मुक्त होण्यासाठी खूप प्रभावी ठरते. त्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

तुळशीचे उपयोग :

कोविड 19 दरम्यान तुळशीच्या उपयोगाचाही खूप शोध घेण्यात आला. खरंतर तुळस कोमट पाण्यात उकळून त्याचे सेवन केल्यास खोकल्याची समस्या दूर होते.