जास्त मीठाचं सेवन करताय? आजच आहारातून कमी करा, टक्कल पडण्यासोबतच अनेक दुष्परिणाम…

| Updated on: Mar 01, 2022 | 1:06 PM

Baldness : जवळपास सर्वच वयोगटात केस गळण्याची समस्या सामान्य आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केल्यास अकाली टक्कल पडण्याची समस्या निर्माण होउ शकते. त्यामुळे याचा परिणाम आपल्या व्यक्तीमत्वावरदेखील निर्माण होत असतो. त्यामुळे वेळीच या समस्यांना आवर घालावा.

जास्त मीठाचं सेवन करताय? आजच आहारातून कमी करा, टक्कल पडण्यासोबतच अनेक दुष्परिणाम...
मीठाच्या अतिसेवनानं टक्कलपणासह निर्माण होतात विविध समस्या
Follow us on

Baldness : प्रदूषण, बदलती जीवनपद्धती, (Lifestyle) आहारातील चुकीच्या सवयी आदी सर्वांचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. आपण रोजच्या जेवणात काय खातोय, यावरदेखील बरचं काही अवलंबून असते. तुमच्या रोजच्या जेवणातील ठराविक पदार्थ तुमच्या केसगळतीला कारणीभूत ठरत आहे, असे तुम्हाला सांगितल्यास विश्‍वास बसणार नाही. परंतु हे खरं आहे. असे अनेक पदार्थ असता जे आपल्या व्यक्तीमत्वावर परिणाम करीत असतात. डोक्यावरील केस हे केवळ महिलांसाठीच नव्हे तर पुरुषांच्या व्यक्तीमत्वासाठी (Personality) अत्यंत आवश्‍यक असतात. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये केसगळतीची (Hair fall) समस्या अगदी सर्वच वयोगटासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. स्त्रिया आणि पुरूष दोघांमध्ये केस गळणे वेगवेगळ्या प्रकारे पाहिले जाते. केस गळण्याची सर्वात सामान्य स्थिती म्हणजे ‘एंड्रोजेनेटिक अलोपेसिया’ ज्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये केस गळतात. हे सामान्यतः 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये दिसून येते. मात्र, यामागे वय हा एकच घटक नसून एका खाद्यपदार्थाचा केसांवर परिणाम होऊन ते बारीक होतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

काय सांगतात तज्ज्ञ?

ब्रिटनमधील प्रसिद्ध ट्रायकोलॉजिस्ट असलेले केविन मूर म्हणतात, की अन्नामध्ये जास्त मीठ हे केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे केस गळतात. ‘ब्रिटिश जीक्यू’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील सोडिअमचे प्रमाण वाढते व नंतर ते केसांच्या तळांच्या आजूबाजूला जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे केसांच्या तळांच्या रक्ताभिसरणावर परिणाम होतो. यामुळे आवश्यक पोषक द्रव्ये केसांच्या तळांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. जास्त प्रमाणात मीठाचे सेवन केल्याने केस निर्जीव आणि कमकुवत होतात आणि हेच त्यांच्या गळतीचे कारण बनते. मात्र दुसरीकडे खूप कमी सोडियममुळे केसांच्या वाढीमध्ये समस्या येतात.
खूप कमी मीठ खाल्ल्याने शरीरात आयोडीनची कमतरता निर्माण होते, जी थायरॉइडच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असते. तज्ज्ञांच्या मते, केसांची ताकद आपल्या रोजच्या आहारातील जीवनसत्त्वे आणि खनिजांवर अवलंबून असते. लोह आणि व्हिटॅमिन B5 केस पातळ होण्यास प्रतिबंध करतात आणि टाळू निरोगी ठेवतात. केसांच्या मजबुती आणि चमकसाठी प्रोटीन आवश्यक असतात. तसेच, पर्यावरणीय समस्यांमुळे केसांची गुणवत्तादेखील खराब होते. काही लोकांमध्ये केसगळती ही अनुवांशिकदेखील आहे.

जास्त मीठ धोकादायक

शरीर मज्जातंतू आणि स्नायूंच्या कार्यासाठी मीठ योग्य प्रमाणात आवश्‍यक असते. परंतु त्याचे जास्त प्रमाण उच्च रक्तदाबास कारणीभूत ठरत असते. हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. ‘एनएचएस’नुसार, प्रौढांनी दिवसातून 6 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. हे अंदाजे एक चमचा आहे, ज्यामध्ये 2.4 ग्रॅम सोडियम आहे. काही खाद्यपदार्थांमध्ये आधीपासून मीठ असते उदाहरणार्थ, टोमॅटो सॉस, पॅकेज केलेले पदार्थ, ब्रेड, प्रोसेस फूड, पिझ्झा, सँडविच आणि सूप यासारख्या गोष्टींमध्ये आधीपासून काही प्रमाणात मीठ असते. अशा परिस्थितीत तुम्ही काय खरेदी करत आहात याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.

आणखी वाचा :

Health Care : प्रोटीन शेकचे अधिक सेवन करत आहात? जाणून घ्या शरीराला होणारे नुकसान!

आहारात कमी कॅलरीज्‌ घ्या अन्‌ दीर्घायुषी व्हा… काय सांगतो अभ्यास

थायरॉईडच्या समस्येवर नियंत्रण मिळवायचंय, 3 ज्यूसचं सेवन करताच दिसेल सकारात्मक परिणाम