मुंबई : डोकेदुखी ही लोकांमध्ये एक सामान्य समस्या आहे, ज्याचा तुमच्या जीवनशैलीवर खूप वाईट परिणाम होतो. डोकेदुखीमुळे तुम्हाला अनेक आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. डोकेदुखीमुळे कमी झोप, तणाव, जेवण न जाणे अर्थात कमी भूक लागणे आणि सतत घाम येणे इत्यादी समस्या उद्भवतात. डोकेदुखीच्या उपचारांसाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे. प्राचीन काळापासून योगा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. उत्तम आरोग्य ठेवण्याच्या दृष्टीने योगा करण्याचे अनेक फायदे आहेत. (Three effective yogas to get relief from headaches)
आपला डोकेदुखीचा त्रास थांबवण्यासाठी तीन योग मुद्रा महत्त्वाच्या आहेत.
शरीराला आराम देणे आणि इंद्रियांना शांत करणे हा या मुद्राचा मुख्य हेतू आहे. मनन करण्यासाठी ही चांगली मुद्रा आहे. शवासन मुदा केल्यामुळे डोकेदुखी आणि तणाव दूर करण्यास मोठेी मदत होते. हे आसन करण्याची पद्धत…
– योगा चटईवर जमिनीला पाठ पूर्णपणे टेकवून झोपी जा.
– आपल्या शरीराला आराम देण्यासाठी, शरीर सैल सोडा. याची सुरुवात पायांच्या बोटांपासून करा.
– डोळे बंद करा.
– आपला श्वास शांत आणि हळू करण्याचा प्रयत्न करा.
– जोपर्यंत आपणास आराम होत नाही तोपर्यंत या पोजमध्ये राहा.
– आपण हे 5 ते 10 मिनिटांसाठी करू शकता.
या योगासनाच्या नावावरूच कळते की, शरीराला पुलासारख्या पोझमध्ये ठेवण्याची गरज आहे. यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळेल. त्याचबरोबर पेटके येण्याचा त्रासही थांबेल. हे आसन करण्याची पद्धत…
– योगा चटईवर झोपणे.
– आपले हात चटईवर ठेवा.
– आता आपले गुडघे दुमडा. हातांवर वजन ठेवा आणि नितंब वर उचला. आपला श्वास आत घ्या.
– पाय घट्टपणे ठेवा. शक्य तितक्या मागे दुमडणे. यावेळी वरच्या बाजूस पाहा.
– त्यानंतर नितंब खाली आणून विश्रांती घ्या.
– याच कृती पुन्हा करा.
ही योग मुद्रा मुलांसारखीच असते. हे तणाव दूर करण्यासाठी तसेच डोकेदुखीवर उपचार करण्यासाठी केले जाणारे आसन म्हणून ओळखले जाते. हे आसन करण्याची पद्धत…
– आपले पाय एकत्रित करून योगा चटाईवर बसा आणि आपले गुडघे वाकवा.
– आपले हात वरच्या दिशेने पसरवा आणि आपल्या शरिराला आराम द्या.
– आपले हात हळूवारपणे चटईच्या दिशेने आणा. ते सरळ आणि बाहेरील बाजूस पसरलेले असल्याची खात्री करा.
– आपले डोके चटईवर टेकवा आणि हळूवारपणे श्वास नियंत्रणात आणा.
– जोपर्यंत आपण आरामदायक आहात, तोपर्यंत याच पोझमध्ये राहा.
– त्यानंतर पुन्हा याच कृती करा. (Three effective yogas to get relief from headaches)
Corona Vaccination | मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्यांचे Walk In लसीकरण#Mumbai #CoronaVaccine #VaccinationDrive #VaccineFor18Plus https://t.co/O8Sxcknvbk
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 28, 2021
इतर बातम्या
देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेला दंड, RBI नियमांचे उल्लंघन करणं भोवलं