नवीन वर्षाचे आगमन अगदी एका तासांवर येऊन ठेपलं आहे. तसेच या वर्षाचा शेवट आनंदात साजरा करण्यासाठी अनेकजण फिरायचा प्लॅन करतात. त्याच बरोबर मुलांना देखील सुट्ट्या असल्याने तुम्ही कुटुंबासोबत, मित्रांसोबत अशी अनेक ठिकाण आहेत जी एक्सप्लोर करू शकतात. त्याच बरोबर देशात अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे तुम्ही 15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये अगदी आरामात फिरू शकता. नवीन वर्षात कुठेही फिरण्याचा बेत आखला नसेल तर लगेच काही प्लॅन्स आताच करा. या लेखात आज आम्ही अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही फक्त 15 हजार रुपयांत फिरू शकता.
तसं तर 15 हजारांच्या बजेटबद्दल अनेकांना प्रश्न पडला असेल, पण जर तुम्ही तुमच्या ट्रिपचं योग्य प्लॅनिंग केलं तर या बजेटमध्ये एक उत्तम ट्रिप अगदी आरामात मॅनेज करता येऊ शकते. इतकंच नाही तर या बजेटमध्ये तुम्ही ऑफबीट स्पॉट्सही कव्हर करू शकता. चला तर मग जाणून घेऊया अशा ठिकाणांबद्दल जिथे तुम्ही तुमचं नवं वर्ष चांगलं सेलिब्रेट करू शकता.
“गोल्डन सिटी” म्हणून प्रसिद्ध असलेले जैसलमेर हे एक सुंदर शहर आहे, जे तुम्हाला अनोख्या पिवळ्या वालुकाश्म स्थापत्य कलेसाठी दूरवर प्रसिद्ध आहे. जर तुम्ही अद्याप या महान शहराला भेट दिली नसेल तर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भेट द्या. इथे तुम्ही फक्त किल्ला पाहू शकत नाही, तर वाळवंटातही कॅम्प करू शकता. जर तुम्ही 3-4 दिवसांसाठी जैसलमेरला जाण्याचा प्लॅन करत असाल तर 15 हजार रुपयांचं बजेट तुमच्यासाठी परफेक्ट आहे. येथे राहण्यासाठी दिवसाला सुमारे ५०० रुपये मोजावे लागतील. त्याचबरोबर जेवण आणि वाहतुकीवर 1000 रुपयांपर्यंत खर्च कराल.
जर तुम्हाला मसूरी आणि उटी सारख्या ठिकाणांना भेट द्यायची नसेल तर उत्तराखंडमधील कनाताल हे तुमच्यासाठी उत्तम ठिकाण आहे. नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी कनाताल हे उत्तम ठिकाण आहे. जर तुम्ही येथे 3 ते 4 दिवसांच्या ट्रिपचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला हॉटेलसाठी 1000 रुपये मोजावे लागतील. याशिवाय खाण्या-पिण्यासाठी सुमारे 500-600 रुपये मोजावे लागतील. त्याचबरोबर वाहतुकीबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 500 रुपयांपेक्षा जास्त असणार नाही.
“गेटवे टू द गढवाल माउंटेन्स” म्हणून ओळखले जाणारे ऋषिकेश भारताची योग राजधानी म्हणून देखील ओळखले जाते. लक्ष्मण झूला, राम झूला आणि त्रिवेणी घाट तुम्ही इथे पाहू शकता. ऋषिकेशमध्ये ही तुम्ही राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता. प्रति व्यक्ती फक्त ५००० रुपये खर्च करून तुम्ही ऋषिकेशला भेट देऊ शकता. ऋषिकेशला जाण्यासाठी ५०० ते १००० रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. त्या सोबत राहण्यासाठी 1000 रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. खाण्या-पिण्यासाठी ५०० ते ६०० रुपये मोजावे लागतील.
अश्या प्रकाराने तुम्ही नवं वर्षाचे स्वागत करण्यासाठी या शहरांना भेट देऊन ट्रिप मस्त एन्जॉय करू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही.)