Goa Tourism Hidden Beach : सागरी किनारा आणि नाईट लाईफसाठी गोवा ओळखला जातो. गोव्यात तुम्ही रात्रभर समुद्र किनाऱ्यावर एन्जॉय करु शकता. देशातूनच नव्हे तर परदेशातून आलेले पर्यटकही या पार्ट्यांमध्ये सहभागी होतात. अथांग सागर आणि नाईट लाइफ यामुळे अनेकांचा ओढा गोव्याकडे असतो. पण गोव्यातील काही ठिकाणे अजूनही बऱ्याच लोकांना माहीत नाहीत. जर तुम्हाला गर्दीपासून आणि गोंधळापासून दूर एखाद्या निसर्गरम्य जागेत जायचं असेल तर तुम्ही या काही बीचवर नक्की जाऊ शकता.
बेतालबाटीम बीच – हा बीच पांढरी वाळू आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. हा बीच गर्दीपासून अत्यंत दूर आहे. या ठिकाणी सूर्य अस्ताला जाताना पाहणं हा एक स्वर्गीय अनुभव असतो. या ठिकाणी असलेली ताजी हवा आणि समुद्राच्या लाटा मनाला आनंद देतात.
💠मुख्य आकर्षण
बेतूल बीच : बेतूल बीच शांत आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मच्छिमारांची वस्ती आहे. ताज्या सीफूडसाठीही हा भाग प्रसिद्ध आहे. हिरवळ आणि निळ्या पाण्यासाठी सुद्धा ही जागा प्रसिद्ध आहे.
💠मुख्य आकर्षण
होल्लांत बीच : होल्लांत बीच हे एक छोटं समुद्र तट आहे. ही निसर्ग प्रेमींची खास आकर्षणाची जागा आहे. इथली हिरवळ, स्वच्छ, निळशार पाणी मोहून टाकतं. तुम्ही या बीचवर कुटुंबासोबत वेळ घालवू शकता.
💠मुख्य आकर्षण
बटरफ्लाय बीच : बटरफ्लाय बीच गोव्यातील सर्वात अनोखा आणि कुणालाही माहित नसलेला बीच आहे. या बीचवर फुलपाखरांचं साम्राज्य आहे. त्यामुळेच या बीचला बटरफ्लाय बीच असं नाव पडलंय. या बीचवर फक्त नावेच्या माध्यमातूनच जाता येतं.
💠मुख्य आकर्षण
अगोंडा बीच : शांत आणि निर्मळ वातावरणासाठी अगोंडा बीच फेमस आहे. या ठिकाणी तुम्हाला सतत समुद्राच्या लाटांची गाज ऐकायला मिळेल. या शिवाय नारळाच्या झाडांची सावली मोहून टाकते. योग आणि ध्यान करण्यासाठी या जागेसारखी दुसरी जागा नाही.
💠मुख्य आकर्षण
गोव्यातील हे बीच फार कमी लोकांना माहिती आहेत. हे सर्व बीच निसर्गाच्या सानिध्यात काम करत आहे. या बीचवर गेल्यावर आपण गोव्यात आहोत की गोव्याबाहेर हा संभ्रम पडेल. त्यामुळे उद्या जर गोव्याला पिकनिकला जाण्याचा प्लॅन करत असाल तर या बीचला तुमच्या यादीत समाविष्ट करा.