नवी दिल्ली: भारतीय रेल्वेची इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरशन(IRCTC) ‘डिव्हाईन महाराष्ट्र’ ही ट्रेन सुरु करत आहे. ही ट्रेन सुरु करण्यामागे महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक आणि जागतिक वारसा स्थळांच्या पर्यटनाला चालना देणे हा उद्देश आहे. आयआरसीटीसीतर्फे चालवली जाणारी ही रेल्वे दिल्लीतील सफदरजंग रेल्वे स्टेशन येथून सटणार आहे. डिव्हाईन महाराष्ट्र ट्रेन ही AC डिलक्स टूरिस्ट असेल. (IRCTC going to start Divine Maharashtra Deluxe Tourist Train)
आयआरसीटीसीने दिलेल्या माहितीनुसार, डिव्हाईन महाराष्ट्र ट्रेन 8 जानेवारीला दिल्लीतून सुटेल आणि 12 जानेवारीला दिल्लीत माघारी पोहोचेल. हा कालावधी 4 रात्र आणि 5 दिवस आहे. या यात्रेमध्ये महाराष्ट्रातील दोन जोर्तिलिंग नाशिकचे त्र्यंबकेश्वर आणि औरंगाबादमधील घृष्णेश्वरला भेट देता येणार आहे. शिर्डीचे साई मंदिर आणि जागतिक वारसास्थळ वेरुळ लेण्या पाहता येणार आहेत. (IRCTC going to start Divine Maharashtra Deluxe Tourist Train)
Experience #luxury on #IRCTC‘s special ‘Deluxe Tourist Train’ while visiting #India‘s prominent religious & heritage destinations like #Sai Temple, #Shani Temple, #Grishneshwar Jyotirlinga, #Traimbakeshwar Jyotirlinga temple. To #book this soothing, visit https://t.co/S6r5cDxZhx
— IRCTC (@IRCTCofficial) December 16, 2020
कसा असेल महाराष्ट्रातील प्रवास
दिल्लीतून सुटणाऱ्या डिव्हाईन महाराष्ट्र ट्रेनमधील पर्यटकांना प्रथम शिर्डीतील साई मंदिराला भेट देता येणार आहे. त्यानंतर औरंगाबादमधील जोर्तिलिंग घृष्णेश्वर मंदिर, त्यानंतर वेरुळ लेण्यांना भेट देता येईल. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला पर्यटकांनी भेट दिल्यानंतर डिव्हाईन महाराष्ट्रची ट्रेन दिल्लीकडे रवाना होईल. (IRCTC going to start Divine Maharashtra Deluxe Tourist Train)
प्रवाशांना काय सुविधा मिळणार
>> आयआरसीटीसीच्या नव्या पर्यटन ट्रेनमध्ये दोन मोठे रेस्टॉरंट, एक आधुनिक किचन, शॉवर क्यबिकल, सेंसर आधारित वॉशरुम, फूट मसाज इत्यादी सुविधा असतील
>> डिव्हाईन महाराष्ट्र ट्रेन पूर्णपणे वातानुकुलित असेल. सुरक्षेसाठी ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेराची सोय आहे. याशिवाय सुरक्षा रक्षक नियुक्त केलेला असेल.
>> ‘देखो अपना देश’ यानुसार देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी ही डिव्हाईन महाराष्ट्र ट्रेन सुरु करण्यात आली आहे.
>> पर्यटकांना दिल्लीतील सफदरजंग, आग्रा, ग्वाल्हेर, झांशी आणि भोपाळ या स्टेशनवर बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग सुविधा उपलब्ध असेल.
डिव्हाईन महाराष्ट्र या ट्रेनचे पॅकेज 23 हजार 840 रुपयांपासून सुरु होते. या दरम्यान प्रवाशांना कोरोनासंबधी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या:
Lockdown : IRCTC कडून 30 एप्रिलपर्यंत ‘या’ खासगी ट्रेनची बुकिंग रद्द
सणासुदीला तिकीट बुकिंग करण्यापूर्वीच Aadhaarला IRCTC खात्याशी करा लिंक; जबरदस्त फायदे
(IRCTC going to start Divine Maharashtra Deluxe Tourist Train)