OYO Wizard : ओयो विझार्डचे रेकॉर्ड ब्रेक वीकेंड, सर्वांत मोठा लॉयल्टी प्रोग्राम, गोल्ड सदस्यांना मोफत रूम नाईट ऑफर

| Updated on: May 21, 2022 | 2:38 PM

सध्या ओयो विझार्ड ३ प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. विझार्ड ब्लू, विझार्ड सिल्व्हर आणि विझार्ड गोल्ड.

OYO Wizard : ओयो विझार्डचे रेकॉर्ड ब्रेक वीकेंड, सर्वांत मोठा लॉयल्टी प्रोग्राम, गोल्ड सदस्यांना मोफत रूम नाईट ऑफर
ओयो विझार्ड
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : ओयो (OYO) या जागतिक हॉस्पिटॅलिटी टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मने (Platform) आपल्या ग्राहकांना प्रत्येकी पाच रात्रींच्या निवासानंतर एक मोफत निवास मिळेल, अशी याची घोषणा केली आहे. जागतिक साथीनंतर भारतात पर्यटनाला (India Tourism) चालना देण्यासाठी हाती घेतलेले हे एक पाऊल आहे. विझार्ड (Wizard) नावाच्या लॉयल्टी प्रोग्रामच्या गोल्ड सदस्यांना मोफत रूम नाइट ऑफर उपलब्ध असेल. भारतातील वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी डिझाइन केलेला हा विझार्ड भारतातील ओयोच्या विझार्ड हॉटेल्समध्ये दहा टक्क्यांपर्यंत सवलत आणि बरेच काही देईल. आपल्या 9.2 दशलक्ष सदस्यांसह ओयो विझार्ड हा भारतातील आघाडीच्या प्रवास किंवा अन्न ब्रँड्सकडून चालवला गेलेला एक मोठा लॉयल्टी प्रोग्राम असून तो भारतातील बजेट वर्गवारी विभागातील सर्वांत मोठा प्रोग्राम आहे. पर्यटकांना प्रवास करणे शक्य करण्यासाठी डिझाइन केलेल्या या ट्रॅव्हल टेक कंपनीच्या लॉयल्टी प्रोग्रामचे ध्येय ओयोच्या नियमित ग्राहकांना पुरस्कृत करण्याचे आहे. ओयोच्या लॉयल्टी प्रोग्रामसाठी भारतभरात, दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबाद येथे सर्वाधिक सबस्क्रायबर मार्केट्स आहेत.

ओयो विझार्ड ३ प्रकारांमध्ये उपलब्ध

सध्या ओयो विझार्ड ३ प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. विझार्ड ब्लू, विझार्ड सिल्व्हर आणि विझार्ड गोल्ड. एक सदस्य म्हणून गोल्ड ग्राहकांना ओयोमध्ये राहिलेल्या पाच रात्रींनंतर प्रतिवर्ष एक मोफत निवास मिळू शकेल. विझार्ड सिल्व्हर आणि ब्लू ग्राहकांना त्यांच्या सातव्या व आठव्या रात्रीसाठी अनुक्रमे रिवॉर्ड स्टे मिळू शकेल. याशिवाय गोल्ड सदस्य आपल्या बुकिंग्ससाठी आधी प्रदान करण्याची गरज न पडता अमर्यादित पे ॲट हॉटेल बुकिंगसाठीही पात्र आहेत. ओयोने डॉमिनोज, लेन्सकार्ट, रिबेल फूड्स, गाना अशा विविध ब्रँड्ससोबत तेरा पेक्षा अधिक ख्यातनाम ब्रँड्ससोबत भागीदारी केली असून त्यातून त्यांच्या विझार्ड क्लब सदस्यांना वापरकर्ता सवलत कूपन आणि व्हाऊचर्स दिले जातील.

हे सुद्धा वाचा

आपल्या ओयो विझार्ड या सुधारित लॉयल्टी प्रोग्रामच्या अनावरणाबाबत बोलताना ओयोचे उत्पादन विभागाचे एसव्हीपी आणि मुख्य सेवा अधिकारी श्रीरंग गोडबोले म्हणाले की,“ओयो किंमतीबाबत जागरूक असलेल्या ग्राहकांना सेवा देते. मग ते कुटुंब असो, मित्र असो, लहान उद्योग किंवा मोठ्या कॉर्पोरेट्सचे कर्मचारी असोत. आमचे फ्री रूम नाइट्स आणि सवलतीच्या दरात राहण्यासारखे उपक्रम ओयोमध्ये वारंवार राहण्याची निवड करण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण त्यांना देतात. आमचा भारतात ग्राहकांनी पुन्हा पुन्हा बुक केलेल्या रात्रींचा शेअर 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 70 टक्क्यांपेक्षा जास्त होता. आमचा विश्वास आहे की, आमच्या सुधारित लॉयल्टी ऑफरिंग्समधून या मोठ्या ग्राहक आधाराला खूप जास्त अपील होईल.”

कसं करणार बुकिंग?

ओयो ग्राहकांना विविध प्रकारची वैशिष्टे देते. जेणेकरून त्यांचा बुकिंग अनुभव सुलभ आणि सुधारित होईल, जसे ओयो ॲपवर ३ स्टेपमध्ये बुकिंग करते येते. लोकेशनवर आधारित राहून स्टोअरफ्रंट्स ब्राऊझ करणे इत्यादी. ओयोच्या शून्य रद्दीकरण शुल्क धोरणाची रचना आजच्या बदलत्या पर्यटकांसाठी सर्वोत्तम ग्राहक अनुभव देण्यासाठी केली गेली आहे.

रेकॉर्ड ब्रेकिंग फेस्टिव्ह वीकेंड

या उन्हाळ्यात ओयोने एप्रिल 2022 मध्ये दोन रेकॉर्ड ब्रेकिंग फेस्टिव्ह वीकेंड बुकिंग्सचा अनुभव घेतला. गुडफ्रायडे आणि विशूच्या आठवड्यात ओयोमध्ये 8 लाख बुकिंग्स झाल्या ज्या 2022 मधील सर्वाधिक होत्या आणि सामान्यतः जास्त मागणीची सुट्टी असलेल्या नववर्षापेक्षाही जास्त होत्या. त्याशिवाय ओयोच्या मिड-समर व्हेकेशन इंडेक्स 2022 नुसार प्रत्येकी 2 पैकी 1 भारतीय पर्यटकाच्या 2022 पासून पहिल्या ट्रिपच्या योजना होत्या आणि सुमारे 94.8 टक्के प्रतिसादकांना भारतात प्रवास करायचा होता. प्रवासातील ही स्थिर वाढ लक्षात घेऊन विझार्ड ग्राहकांना ओयोच्या लॉयल्टी प्रोग्रामचा फायदा होईल.

वारंवार प्रवास करणारे पर्यटक ओयो ॲप डाऊनलोड करून आणि वरच्या बाजूचा डावीकडील मेन्यू क्लिक करून विझार्ड होमपेजवर जाऊ शकतात आणि विझार्ड सदस्य होऊ शकतात. इथे वापरकर्ते विझार्ड ब्लू, गोल्ड आणि सिल्व्हर सदस्यत्वातून निवड करू शकतात. त्याचप्रमाणे वापरकर्ते ओयो ॲपच्या होमपेजवर उपलब्ध असलेल्या विझार्ड बॅनरचाही वापर करू शकतात.