सातारा : जागतिक वारसा स्थळ असलेलं कास पठार (Kaas plateau) हे तेथील विविध प्रकारच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे. कास पठारावर हजारो प्रकारच्या फुलांच्या जाती (Flower varieties) आढळून येतात. कास पठार हे कायमच पर्यटकांचे (tourists) आकर्षण राहिले आहे.कास पठाराला भेट देऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कास पठारावरील हंगाम साधारण ऑगस्ट अखेर सुरू होण्याची शक्यता आहे, तर कास पठारावरील पावसाळी पर्यटन हंगाम येत्या एक ऑगस्टपासून सुरू होणार आहे. कास पठाराला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांकडून प्रवेश शुल्क म्हणून तीस रुपये आकारण्यात येणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही पावसाळी पर्यटन हंगामात पठाराव पर्यटक गर्दी करण्याची शक्यता आहे. नुकतीच सातारा वन विभाग आणि कास पाठार कार्यकारी समितीची एक संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश शुल्क म्हणून तीस रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कास पठार हे तेथील रानफुलांसाठी प्रसिद्ध आहे. कास पठारावर हजारो जातींची फुले आहेत. त्यातील अनेक जातींचे तर आपल्याला नावंही माहित नाहीत. पावसाळ्याच्या दिवसात विशेष: ऑगस्टनंतर हे पठार फुलांनी बहरून जाते. मोठ्या संख्येने पर्यटक कास पठाराला भेट देण्यासाठी येत असतात. म्हणूनच कास पठाराचा समावेश हा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. कास पठारावरील हंगाम साधारण ऑगस्ट अखेर सुरू होण्याची शक्यता आहे, तर कास पठारावरील पावसाळी पर्यटन हंगाम येत्या एक ऑगस्टपासून सुरू होणार आहे. दुर्मीळ फुलांबरोबरच कास पठारावर अनेक असे पॉईंटस् देखील आहे जे अद्यापही दुर्लक्षित आहेत. यामध्ये मंडपघळ, प्राचिन गुहा, कुमुदिनी तलाव, सज्जनगड पॉईंट यांचा समावेश होतो.
दरम्यान गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेली कास परिसर दर्शन सेवा यावर्षीही सुरू करण्याचा निर्णय कास पाठार कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय. ही परिसर दर्शन सफारी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. कास परिसर दर्शन सेवेत जवळपास 50 किलोमीटर प्रवासाचा समावेश असून, यामाध्यमातून प्रवाशांना कास पठाराचे सौंदर्य अनुभवता येणार आहे.