नवी दिल्ली – अकाली केस पांढरे होणे (white hair) हे सर्वांसाठीच त्रासदायक असते. अशा परिस्थितीत पांढरे केस लपवण्यासाठी अनेक लोक केस रंगवतात किंवा केसांना मेंदी (mehendi) लावतात. हेअर डायमध्ये अनेक केमिकल्स असतात, ज्यामुळे केसांचे मोठे नुकसान होते. तर मेंदीचा वापर केसांचा नैसर्गिक रंग (natural colour) म्हणून केला जातो. पण केस रंगवण्यासाठी केवळ मेंहंदीच नव्हे तर इतर पदार्थही वापरू शकतो. त्यांच्या वापरामुळे केसांचा रंग सुधारू शकतो आणि केस मजबूत, दाट आणि लांबही होऊ शकतात. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया.
केस रंगवण्याचे नैसर्गिक मार्ग
बीटाचा वापर
बीटाच्या वापरानेही केसांना चांगला रंग येतो. यासाठी लोखंडी कढईत 1ग्लास पाणी, 1चमचा चहाची पाने, 1चमचा आवळा पावडर, 1 चमचा बीटाचा रस किंवा बीटाचा गर घाला. नंतर हे पाणी चांगले उकळवा. हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात लिंबाचा रस मिसळा आणि गॅस बंद करा. ते थंड झाल्यावर केसांना लावा आणि वाळू द्या. केसांवरील मिश्रण वाळले की केस पाण्याने स्वच्छ धुवावेत. याच्या नियमित वापराने केसांचा रंग आणि आरोग्य दोन्ही सुधारेल.
चहा पावडरचा वापर
जर तुम्हाला तुमचे केस नैसर्गिकरित्या गडद तपकिरी रंगाने रंगवायचे असतील तर स्वयंपाकघरातील चहा पावडरचा वापर करता येऊ शकतो. त्यासाठी 1 ग्लास पाणी घ्या आणि त्यात 2 चमचे चहाची पाने टाकून पाणी उकळावे. नंतर त्यामध्ये 1 चमचा आवळा पावडर घालून मिक्स करा. पाणी घट्ट होऊ लागल्यावर गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवा. ते थंड झाल्यावर केसांना लावावे. हवे असल्यास तुम्ही त्यात 5 से 6 लवंगाही टाकू शकता. असे केल्याने नैसर्गिकरित्या केसांना गडद रंग येतो. 1 तासानंतर केस साध्या पाण्याने धुवा.
कात वापरा
एक लोखंडी भांड्यात 1 ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये 2 चमचे कात पावडर, 4 चमचे आवळा पावडर आणि 4-5 लवंगा घालून ते पाणी उकळा. पाणी गरम झाल्यानंतर गॅस बंद करून थंड होऊ द्या. हे गार पाणी केसांना लावा आणि 1 तासानंतर केस धुवा. या पाण्याच्या नियमित वापराने केसांचा रंग गडद होईल आणि चमकही येईल.