DIY Coffee Face Pack : एक कप कॉफी (coffee) प्यायल्याने आपल्याला फ्रेश वाटतं, एनर्जीही मिळते. पण हीच कॉफी आपल्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर असते हे तुम्हाला माहीत आहे का ? कॉफीमध्ये अनेक अँटी-ऑक्सीडेंट (anti oxiden) गुणधर्म असतात. कॉफीचा वापर आपण टॅन दूर करण्यासाठी देखील करू शकतो.
कॉफीमध्ये अनेक नैसर्गिक घटक मिसळून त्याचा स्किन टॅनिंग घालवण्यासाठी वापर करता येतो. कॉफी ही आपल्या त्वचेच्या छिद्रांमधील मळ स्वच्छ करते. तसेच कॉफीच्या वापरामुळे आपल्या त्वचेवर नैसर्गिक निखारही येतो. यासोबतच कॉफी ही त्वचेवरील डाग कमी करण्याचेही काम करते. यामुळे चेहरा मॉयश्चराइज होण्यासही मदत होते.
टॅनिंगपासून सुटका मिळवण्यासाठी आपण कॉफीचा वापर कोणत्या प्रकारे करू शकतो ते जाणून घेऊय. काही टिप्सच्या मदतीने तुम्ही टॅनिंग सहज घालवू शकता.
कॉफी व मधाचा पॅक
चेहऱ्यासाठी तसेच टॅनिंग दूर करण्यासाठी आपण कॉफी आणि मधही वापरू शकतो. यासाठी एका भांड्यात एक चमचा कॉफी पावडर घेऊन त्यामध्ये एक चमचा मध घालावा. आता हे दोन्ही नीट एकत्र करून मिश्रण तयार करावे. मध व कॉफीचा हा पॅक चेहरा तसेच टॅनिंग झालेल्या भागावर लावून वीस मिनिटे राहू द्या. यानंतर चेहरा व पॅक लावलेला भाग पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे टॅनिंग तर दूर होईलच पण मधामुळे तुमची त्वचाही मऊ राहते.
कॉफी व दूध
जनरली आपण दुधात कॉफी व साखर घालून ती पिण्यास प्राधान्य देतो. पण हीच कॉफी व दूध चेहऱ्यासाठीही उपयोगी पडतात. त्यासाठी एका भांड्यात १ ते २ चमचे दूध घ्या. त्यात एक चमचा कॉफी पावडर घाला. ही पेस्ट नीट एकजीव करावी आणि त्वचेवर लावून 10 मिनिटे ठेवावी. नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवून फडक्याने टिपून तो भाग कोरडा करावा.
कोरफड आणि कॉफी
कोरफडीमधील पोषक गुणधर्म तर सर्वांनाच माहीत आहेत. ती त्वचेसाठीही उपयुक्त ठरते. त्यामुळे कॉफीसोबत कोरफड स्किनसाठी फायदेशीर ठरेल. एका बाऊल मध्ये चमचाभर कॉफी पावडर घेऊन त्यात कोरफडीचा थोडा रस मिसळा व नीट एकत्र करा. ही पेस्ट त्वचेवर 20 मिनिटे राहू द्या. यानंतर त्वचा थंड पाण्याने धुवून टाका. नियमित वापराने अपेक्षित बदल दिसून येईल.
साखर व कॉफी
त्वचेवरील टॅनिंग काढण्यासाठी काढण्यासाठी तुम्ही कॉफी, साखर आणि खोबरेल तेल यांचा एकत्र वापर करू शकता. एका भांड्यात कॉफी पावडर, थोडी साखर व तेल मिसळून एक स्कर्ब तयार करा. गरज असेल तर थोडे पाणी मिसळा. हा स्क्रब त्वचेवर लावून थोडा वेळ मसाज करा. त्यानंतर थंड पाण्याने स्करब लावलेला भाग धुवून घ्या.
लिंबू व कॉफी
एका वाचीत एक चमचा कॉफी घेऊन त्यात आवश्यकतेनुसार लिंबाचा रस घाला. हे दोन्ही नीट मिक्स करून पेस्ट तयार करा. यानंतर कॉफी आणि लिंबाच्या रसाची ही पेस्ट त्वचेवर दहा मिनिटे लावा. वाळल्यानंतर चेहरा अथवा पेस्ट लावलेला भाग स्वच्छ धुवा. नियमित वापराने त्वचेचे टॅनिंग कमी होऊन अपेक्षित फरक दिसेल.