नवी दिल्ली : तुमच्या काखेतील त्वचा काळसर झाल्याने व ते लपवणे कठीण झाल्याने तुम्ही स्लीव्हलेस कपडे (sleeveless clothes) घालण्यास संकोच करता का? बहुतेक महिलांना काळ्या अंडरआर्म्सची (dark underarms) समस्या असते. याची अनेक कारणे असू शकतात. रेझरचा वारंवार वापर करणे, पिगमेंटेशन आणि हेअर रिमूव्हल क्रीम्सचा जास्त वापर केल्याने त्वचेचा रंग गडद होऊ शकतो आणि अंडरआर्म्सच्या भागात डार्क पॅचेस दिसू शकतात. काही घरगुती उपाय आणि नैसर्गिक घटकांच्या (natural ingredients) मदतीने काळ्या अंडरआर्म्सची समस्या कमी केली जाऊ शकते. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
बेकिंग सोडा
काळसर झालेली त्वचा फिकट करण्यासाठी बेकिंग सोड्याचा इतर काही घटकांसह एकत्र वापर केला जाऊ शकतो. यासाठी पाण्यात बेकिंग सोडा मिसळा आणि जाडसर पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट अंडरआर्म्सवर लावा आणि काही मिनिटांसाठी त्वचेला हलक्या हाताने मसाज करा. स्क्रबिंगमुळे तुमच्या त्वचेवर जमा झालेल्या मृत त्वचेच्या पेशींचा थर साफ होतो आणि त्वचेचा रंग फिकट होण्यास मदत होते. मात्र त्वचेवर बेकिंग सोडा लावण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट करून घ्या. एखादी ॲलर्जी असेल तर ते आधीच समजू शकेल.
नारळाचे तेल
नारळाच्या तेलाचा वापर त्वचेचे पोषण करण्यासाठी तसेच तिचा रंग सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो. नारळाच्या तेलात व्हिटॅमिन ई असते, जो त्वचेला चमकणारा नैसर्गिक घटक आहे. अंडरआर्म्सच्या त्वचेला खोबरेल तेलाने मसाज करा आणि 20-25 मिनिटे असेच ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने स्वच्छ करा. हा उपाय नियमितपणे केल्याने अपेक्षित फरक दिसून येईल.
ऑलिव्ह ऑईल
एक चमचा ऑलिव्ह ऑइलमध्ये थोडी ब्राऊन शुगर घालून आणि या दोन गोष्टी नीट मिसळा. त्यानंतर, हे मिश्रण त्वचेवर लावून स्क्रब करावे. व थोड्या वेळाने साध्या पाण्याने धुवून टाका. स्क्रबिंगमुळे तुमच्या त्वचेवर जमा झालेल्या मृत त्वचेच्या पेशींचा थर साफ होतो व अंडरआर्म्सचा रंग पूर्ववत होण्यास मदत होते.
लिंबू
लिंबू एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे. त्याच्या वापराने त्वचा स्वच्छ आणि नितळ होते. लिंबाचा रस नारळाच्या तेलात मिसळून तो अंडरआर्म्सवर लावा किंवा लिंबाच्या फोडी कापून त्या त्वचेवर चोळावे. हा रस 5 मिनिटे त्वचेवर राहू द्या आणि नंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करा. हा उपाय नियमितपणे केल्यास अंडरआर्म्सची काळसर त्वचा हळूहळू फिकट होण्यास मदत होईल. मात्र त्वचेवर लिंबू लावण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट करून घ्या. एखादी ॲलर्जी असेल तर ते आधीच समजू शकेल.