Easy Hacks To Remove Stains : आजकाल बहुतांश घरांमध्ये वॉशिंग मशीन असते, ज्यामुळे कपडे धुण्याचे काम सोपे होते. पण वॉशिंगमशीन मध्ये कपड्यांवरील चिवट डाग (stains on clothes) सहजासहजी जात नाहीत. त्यासाठी कपडे भिजवून, नीट चोळून, घासून धुवावे लागतात. पण काही डाग तर इतके चिवट असतात, जे जोर लावून धुतल्यावरही जात नाहीत. कपड्यावर पडलेले चहा-कॉफी, कोल्डड्रिंक किंवा खाद्यापदार्थांचे डाग सहज जात नाहीत.
कपडे एकत्र धुतले की कपड्यांचा रंगही एकमेकांवर लागतो. अशा परिस्थितीत हे हट्टी डाग काढून टाकण्याच्या सोप्या पद्धतीबद्दल (Easy Hacks To Remove Stains) जाणून घेऊया. या उपायांनी शाईपासून ते कॉफीपर्यंत अनेक डाग सहज निघतील.
या ट्रिक्स करा फॉलो
आंबट दही
बऱ्याच वेळा शर्टावर पानाचे किंवा तसेच काही पदार्थांचे डाग लागतात, जे काढणं खूपच कठीण असतं. या डागांमुळे कपडे वापरण्याजोगे रहात नाहीत. खसाखसा धुवूनही ते डाग जात नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही आंबट दह्याचा वापर करू शकतात. आंबट दही या डागांवर लावून १० मिनिटे ठेवावे व नंतर हाताने चोळून, घासून,
कोमट पाणी
गडद आणि हट्टी डाग काढून टाकण्यासाठी कोमट पाण्यात कपडे धुणे फायदेशीर ठरते. कपड्यांवर चहा-कॉफी पडली असेल आणि त्याचे डाग काढायचे असतील, तर कपडे कोमट पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर साबण आणि डिटर्जंट पावडर लावून पुन्हा कोमट पाण्यानेच स्वच्छ करावेत. असे केल्याने डाग निघून जातात.
मीठ व लिंबू
किचनमध्ये वापरल्या जाणार्या मीठ आणि लिंबाच्या मदतीने कपड्यांवरील ग्रीसचे डाग सहज काढता येतात. लिंबू व मीठ वापरल्याने फारसा परिणाम होत नसेल, तर मीठात अल्कोहोल टाकूनही तुम्ही कपडे स्वच्छ करू शकता. या उपायांनी हट्टी व चिवट डाग जाण्यास मदत होईल.