नवी दिल्ली : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून दिवसा ऊन (heat) खूपच वाढते. अशा उन्हात बाहेर गेल्याने डोकेदुखी, डिहायड्रेशन, असे आरोग्याचे त्रास तर होतातच पण उन्हाच्या संपर्कात आल्याने आपली त्वचाही अनेकदा निस्तेज होते. उन्हामुळे 875447(tanning) होते, त्यामुळे चेहरा व हातपाय खराब दिसू लागतात. सौंदर्यात बाधा येऊ शकते. अशावेळी टॅनपासून मुक्त होण्यासाठी अनेक महिला पार्लरचा रस्ता निवडतात, पण तेथील उत्पादनांमध्ये अनेक केमिकलचा वापर केला, जे भविष्यात त्वचेसाठी हानिकारक (harmful for skin) ठरू शकते. अशा परिस्थितीत काही घरगुती उपायांच्या मदतीने टॅनिंग दूर करता येऊ शकते, त्याचा नियमित वापर केल्यास फायदा होतो.
दूध आणि केळ्याचा फेसपॅक – दूध आणि केळ्यापासून बनवलेला फेसपॅक त्वचेवरील टॅनिंग दूर करू शकतो. याचा वापर केल्याने चमक टिकून राहते आणि तुमची त्वचा मॉयश्चराइज होते. हा फेस पॅक बनवण्यासाठी आधी एक पिकलेले केळे घ्या आणि ते मॅश करून दुधात मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर नीट लावा आणि अर्धा तास राहू द्या. यानंतर चेहरा थंड पाण्याने नीट धुवून स्वच्छ करा.
बेसन व कोरफड जेल – बेसन आणि कोरफडीचा फेस पॅक देखील टॅनिंग दूर करण्यासाठी उपयुक्त मानला जातो. बेसन आणि कोरफडीचा फेस पॅक बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये अर्धा कप बेसन घ्या आणि त्यात दोन ते तीन चमचे कोरफडीचे जेल मिसळा, हे मिश्रण नीट मिक्स करा आणि चेहऱ्यावर व टॅनिंग झालेल्या भागावर लावून अर्धा तास तसेच राहू द्या. यानंतर चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ करा.
कोरफड व पपईचा फेस पॅक – कोरफड आणि पपईच्या फेसपॅकने टॅनिंगच्या समस्येवरही बऱ्याच अंशी मात करता येते. ते तयार करण्यासाठी, पपईचे चार ते पाच तुकडे घेऊन ते मॅश करा व त्यामध्ये 2 ते 3 चमचे कोरफड जेल घाला. हे नीट मिसळा आणि चेहऱ्यावर आणि मानेवर व्यवस्थित लावा. अर्धा तास तसेच राहू द्या आणि वाळल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करा.
हळद, मध व कोरफडीचा फेस पॅक – टॅनिंगपासून मुक्त होण्यासाठी, एका वाटीत एक चिमूटभर हळद, थोडा मध आणि कोरफडीचे जेल मिसळा. त्याची गुळगुळीत पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहरा, मान आणि हातांवर लावा. व ती 20 मिनिटे तसेच राहू द्या, वाळल्यानंतर पेस्ट कोमट पाण्याने धुवा. नियमित वापराने टॅनिंग कमी होईल व तुमची त्वचा चमकदार दिसेल.