नवी दिल्ली – केस हा आपल्या सौंदर्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. ते नसतील तर आपल्या दिसण्यावर परिणाम होऊ शकतो. केसांची नीट काळजी (hair care) घेतली नाही तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यापैकीच एक समस्या म्हणजे स्प्लिट एंड्स अर्थात दुभंगलेले केस (split ends). दुभंगलेल्या केसांचा अनेक महिलांना त्रास होतो, त्यामुळे त्यांना तणावही जाणवतो. केस दुभंगलेले असतील तर केसांची वाढ थांबते. ही समस्या दूर करण्यासाठी अनेक वेळेस दुभंगलेले केस हे कात्रीने कापावे लागतात. अयोग्य आहार घेतल्याने केसांना पोषण (nutrition) मिळत नाही, त्यामुळे हा त्रास होतो. केस न कापता स्प्लिट एन्ड्सचा त्रास कसा दूर करायचा हे जाणून घेऊया.
काय करावा उपाय ?
तज्ज्ञांच्या मतानुसार, केस खूप कोरडे आणि निर्जीव होतात, तेव्हा ते दुभंगण्याची समस्या उद्भवते. खरंतर केसांच्या वर एक संरक्षक थर असतो आणि जेव्हा तो खराब होतो तेव्हा केसांची टोके दोन भागात विभक्त होतात आणि स्प्लिट एंड्सची समस्या उद्भवते.
1) केमिकल बेस्ड शांपूचा वापर टाळा
जेव्हा तुम्ही केमिकलयुक्त हेअर प्रॉडक्ट्सचा जास्त वापर करू लागता, तेव्हा केसांसदर्भात समस्या उद्भवतात. त्यामुळे केसांसाठी कठोर शांपू वापरण्याऐवजी सौम्य शांपू वापरावा. त्यामुळे स्प्लिट एंड्सची समस्या हळूहळू कमी होईल.
2) गरम टॉवेलचा करा वापर
स्प्लिट एंड्सचा त्रास दूर करण्यासाठी, गरम टॉवेल वापरण्याचा उपाय बऱ्याच काळापासून सुरू आहे. आणि तो खूप प्रभावीही ठरतो. त्यासाठी सर्वप्रथम केसांना खोबरेल तेल लावून हलक्या हाताने मसाज करा. नंतर एक स्वच्छ टॉवेल गरम पाण्याच्या बादलीत बुडवा व पिळून घ्या. हा टॉवेल केसांवर लावून गुंडाळून घ्या आणि 5 ते 10 मिनिटे तसेच राहू द्या. ही प्रक्रिया 4-5 वेळा करावी करा. हा उपाय नियमितपणे केल्यास काही दिवसात फरक पडेल व दुभंगलेल्या केसांपासून मुक्ती मिळेल.
3) पपईचा वापर करा
पपई ही केवळ आपल्या आरोग्यासाठीच नव्हे तर आपल्या केसांसाठीही तितकीच फायदेशीर आहे. दुभंगलेल्या केसांचा त्रास दूर करायचा असेल तर पपईचा वापर करावा. त्यासाठी एक पिकलेली पपई घेऊन त्याचा पल्प काढून एका भांड्यात ठेवा. त्यानंतर त्यात दही घालून हे मिश्रण केसांवर व स्काल्पवर लावावे. हा उपाय नियमितपणे केल्यास काही दिवसात फरक पडेल व दुभंगलेल्या केसांपासून मुक्ती मिळेल.
(डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)