नवी दिल्ली | 19 ऑगस्ट 2023 : वातावरणातील बदलाचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर (effect on skin) दिसून येतो. विशेषत: वातावरणातील आर्द्रता कमी झाल्यानंतर त्वचा कोरडी (dry skin) होऊ लागते. यामुळे आपला चेहराही रखरखीत आणि निस्तेज दिसू लागतो. कोरड्या त्वचेमुळे चेहऱ्यावर लालसरपणा आणि रॅशेस (rashes) होण्याचा त्रास होऊ लागतो.
कोरड्या त्वचेपासून वाचण्यासाठी काही लोक ब्युटी ट्रीटमेंटच वापर करण्यापासून ते अनेक महागडी उत्पादने खरेदी करतात. पण त्यामुळे खिशाला कात्री लागू शकते. त्याऐवजी काही घरगुती उपायांच्या मदतीनेदेखील ड्रायनेस कमी करता येऊ शकतो.
व्हिटॅमिन ई
व्हिटॅमिन ई हे केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. यामुळे चेहऱ्याची त्वचा हायड्रेट आणि मॉइश्चराइज राहते. कोरफडीमध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळून तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता.
गुलाबपाणी
गुलाबपाण्यामुळे ताजेपणा जाणवतो. भारतात अनेक शतकांपासून गुलाब पाण्याचा वापर केला जात आहे. यामुळे त्वचेला ताजेपणा येतो. त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यासाठी गुलाबपाणी हा उत्तम पर्याय असू शकतो. गुलाबपाणी व ग्लिसरीन एकत्र मिसळून त्वचेवर लावता येते. तसेच तुम्ही रात्री गुलाबपाण्याने चेहरा धुवू शकता.
ऑलिव्ह ऑईल
ऑलिव्ह ऑईल हे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम मानले जातेच, पण ते त्वचेसाठीही खूप फायदेशीर असते. यामुळे त्वचेच्या कोरडेपणापासून आराम मिळू शकतो. मात्र, ऑलिव्ह ऑईल थेट त्वचेवर लावणे टाळावे. ते गार दुधात मिळून त्वचेवर लावावे.
मधाचा वापर
कोरड्या त्वचेपासून सुटका हवी असेल तर मधाचा वापरही उपयोगी ठरतो. चेहरा साध्या पाण्याने धुवून त्यावर मध लावा व १० मिनिटे वाळू द्या. त्यानंतर चेहरा पुन्हा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचा मुलायम होईल.
केळ्याचा पॅक
केळ्याचा पॅकही त्वचेसाठी उत्तम ठरत. केळ्याचे साल काढून ते मॅश करा व चेहऱ्यावर लावा, १५ मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवा. नियमित वापराने फरक दिसून येईल.
या सर्व घरगुती उपायांव्यतिरिक्त, आपण आपल्या आहाराकडे देखील लक्ष दिले पाहिजे. स्वतःला शक्य तितके हायड्रेटेड ठेवावे. त्वचेला हायड्रेट ठेवणाऱ्या गोष्टींचा आहारात समावेश करावा. भरपूर पाणी व द्रव पदार्थही प्यावेत.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)