घरबसल्या पार्लरसारखा ग्लो हवा आहे ? या होममेड स्क्रबचा करा वापर

| Updated on: Aug 07, 2023 | 11:29 AM

प्रदूषणामुळे त्वचेवर टॅन आणि मळ जमा होतो. डेड स्किन सेल्स (मृत पेशी) दूर करण्यासाठी तुम्ही होममेड स्क्रबचा वापर करू शकता.

घरबसल्या पार्लरसारखा ग्लो हवा आहे ? या होममेड स्क्रबचा करा वापर
Follow us on

DIY Body Scrub : आपल्या त्वचेसाठी एक्सफोलिएशन खूप गरजेचे असते. एक्सफोलिएशन म्हणता किंवा स्क्रबिंग (scrubbing), यामुळे त्वचेची खोलवर स्वच्छता होते. स्क्रबिंगमुळे छिद्रांमध्ये साचलेली घाण (cleaning) साफ होण्यासही मदत होते. धूळ आणि प्रदूषणामुळे (pollution damages skin) त्वचेवर बऱ्याच वेळेस घाण किंवा मळ जमा होतो. यामुळे आपली त्वचा सुस्त आणि निर्जीव दिसू लागते.

त्यासाठी स्क्रबिंगचा वापर केल्यास फायदा होतो. हा स्क्रब बनवण्यासाठी तुम्ही घरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक गोष्टींचाही वापर करू शकता.त्यामुळे छिद्र स्वच्छ होतात आणि ते ओपन होतात. केवळ चेहराच नाही तर संपूर्ण शरीरही स्क्रब करणे तितकेच महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत तुम्ही कोरफड आणि कॉफी यासारख्या गोष्टींचा वापर करून स्क्रब बनवू शकता. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि चमकदारही राहील. होममेड स्क्रबसाठी कोणत्या गोष्टींचा वापर करू शकता, ते जाणून घेऊया..

साखर आणि कोरफड

तुम्ही साखर आणि कोरफड यांचा वापर करून स्क्रब तयार करू शकता. त्यासाठी एका भांड्यात 4 चमचे साखर घेऊन त्यात गरजेप्रमाणे कोरफडीचा रस मिसळावा. ताज्यास कोरफडीचा रस किंवा बाजारात मिळणारे कोरफडीचे जेलही वापरू शकता. हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्यावर आणि शरीरावर लावावे आणि गोलाकार पद्धतीने काही मिनिटे मसाज करावा. 10-12 मिनिटांनी त्वचा, साध्या पाण्याने स्वच्छ धुवावी. महिन्यातून 3-4 वेळा याचा वापर केल्यास त्वचेचे टॅनिंग तसेच डेड स्कीन सेल्स दूर होण्यास मदत होते. त्वचा चमकदार दिसू लागेल.

कॉफी आणि कच्चं दूध

तुम्ही त्वचेसाठी कॉफी व कच्चं दूधही वापरून स्क्रब बनवू शकता. त्यासाठी एका भांड्यात थोडी कॉफी पावडर घेऊन त्यात गरजेप्रमाणे कच्चे दूध मिसळावे. आता हा पॅक चेहरा किंवा शरीरावर लावून हलक्या हाताने मसाज करावा. दहा मिनिटे तसेच राहू द्यावे. नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवावे. कॉफी आणि कच्चं दूध यांनी बनलेला हा स्क्रब त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यास मदत करेल.

ओट्स आणि दही

हा स्क्रब बनवण्यासाठी एका भांड्यात 5चमचे ओट्स घेऊन त्यात दोन चमचे दही घाला. हे नीट मिसळून होममेड स्क्रब तयार करा. तो स्क्रब चेहऱ्यावर लावून बोटांच्या पुढल्या भागाने हळूवार मसाज करा. थोड्या वेळाने चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. या स्क्रबमुळे त्वचा हेल्दी बनते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)