नवी दिल्ली – केसांची काळजी (hair care) घेण्यासाठी त्यांना नियमितपणे तेल लावून मालिश करणे महत्वाचे ठरते. बाजारात अनेक तेल (hair oil) उपलब्ध आहेत, जे केसांसाठी फायदेशीर ठरतात असा दावा केला जातो, मात्र त्यामुळे केसांना खूप फायदा मिळत नाही. बाजारातून महागडे आणि भेसळयुक्त हेअर ऑइल विकत घेण्याऐवजी तुम्ही घरी थोडे तेल (homemade oil for hair growth) बनवून केसांना लावू शकता. घरी बनवलेल्या तेलामध्ये कोणताही सुगं
कढीपत्त्याचे तेल
हे तेल बनवण्यासाठी एका भांड्यात खोबरेल तेल घेऊन गरम करावे. त्यानंतर कढीपत्त्याची स्वच्छ धुतलेली काही पाने या तेलात घालून तेल चांगले उकळू द्यावे.
गार झाल्यावर हे तेल गाळून घ्यावे आणि एका बाचलीत भरून ठेवावे. या तेलाने केसांना नियमितपणे मालिश करावे. या तेलाच्या वापराने केस काळे होतातच पण दीर्घकाल काळेही राहतात.
कांद्याचे तेल
कांदा हा केसांसाठी उत्तम ठरतो. कोणत्याही रसायनाशिवाय कांद्याचे तेल घरी तयार करण्यासाठी एका भांड्यात खोबरेल तेल गरम करा आणि त्यात चिरलेला कांदा घाला. कांदा शिजल्यानंतर हे तेल गाळून बाटलीत ठेवावे. व नियमितपणे त्याचा वापर करावा.
आवळ्याचे तेल
हे तेल बनवण्यासाठी तुम्हाला बेस ऑइलसाठी खोबरेल तेल वापरावे लागेल. एका मोठ्या भांड्यात शुद्ध खोबरेल तेल गरम करावे. यामध्ये तुम्हाला ताज्या
आवळ्याऐवजी वाळलेल्या आवळ्याचा वापर करावा लागेल. वाळलेल्या आवळ्याचे बारीक तुकडे करून या तेलात घालावेत. मात्र हे तेल लगेच वापरू नका. हे तेल बाटलीत घालून 12 ते 15 दिवस उन्हात ठेवावे लागते. थोड्याच दिवसात तुमचे तेल वापरासाठी तयार होईल.
कलौंजीचे तेल
काळ्या रंगाची कलौंजी ही केसांसाठी चांगली असते. त्यामध्ये भरपूर प्रमाणात झिंक, लोह आणि पोटॅशिअम देखील आढळते, जे केसांना पूर्ण पोषण देऊन वाढण्यास मदत करते. हे तेल बनवण्यासाठी नारळाच्या तेलाशिवाय ऑलिव्ह ऑईलचाही वापर करता येतो. भांड्यात तेल उकळल्यानंतर त्यात एक चमचा कलौंजी टाकावी. थोड्या वेळाने तेल गाळून बाटलीत भरून केसांसाठी नियमितपणे वापरा.