Rose Face Pack: चमकदार त्वचेसाठी वापरा गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनलेला फेसपॅक

| Updated on: Dec 13, 2022 | 9:32 AM

गुलाबाच्या पाकळ्यांचा तुम्ही फेसपॅकच्या स्वरूपातही वापर करू शकता. हा फेसपॅक त्वचेसंदर्भातील अनेक समस्या दूर करण्यास मदत करतो.

Rose Face Pack: चमकदार त्वचेसाठी वापरा गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनलेला फेसपॅक
गुलाब पाकळ्यांचा फेसपॅक
Follow us on

नवी दिल्ली – गुलाब हे एक असं फूल आहे जे बहुतांश जणांना आवडतं. त्याचे विविध रंग, मन मोहून टाकणारा सुवास यामुळे ते लोकप्रिय ठरतं. गुलाबाचं फूल केवळ केसांच माळण्यासाठी किंवा बुकेच्या स्वरूपात घराची शोभा वाढवण्यासाठीच नसते तर त्याचा त्वचेसाठीही (beauty products) वापर केला जातो. गुलाबाच्या फुलामध्ये अँटी-ऑक्सीडेंट गुण असतात, तसेच व्हिटॅमिन ए, सी, डी आणि ई हेही असते. आपण गुलाबजलाचा (rose water) सौंदर्य प्रसाधन म्हणून वापर करतो. त्याचप्रमाणे गुलाबाच्या पाकळ्यांचाही फेसपॅकच्या (rose petals face pack) स्वरूपात वापर करता येऊ शकतो. हा फेसपॅक त्वचेसंदर्भातील अनेक समस्या दूर करण्यास मदत करतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि रेषांपासूनही सुटका होते.

गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून विविध प्रकारचे फेसपॅक तयार करता येऊ शकतात.

दही आणि गुलाबाचा पॅक

हे सुद्धा वाचा

दही हे केवळ खाण्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही उपयुक्त ठरते. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिकरित्या चमक येते. दही व गुलाबाचा फेसपॅक बनवण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांची पेस्ट बनवून ती एका बाऊलमध्ये घ्यावी. नंतर त्यामध्ये एक चमचा मध आणि एक मोठा चमचा दही घालावे. हे सर्व नीट एकत्र करावे व हा फेसपॅक आपला चेहरा आणि मानेवर लावावा. थोड्या वेळानंतर फेसपॅक वाळल्यानंतर चेहरा व मान साध्या पाण्याने स्वच्छ धुवावे.

कच्चं दूध व गुलाब पाकळ्यांचा फेसपॅक

ताजा गुलाब घेऊन त्याच्या पाकळ्यांची वाटून पेस्ट बनवा. नंतर एका वाटीमध्ये गुलाब पाकळ्यांची पेस्ट, दोन चमचे बेसन आणि कच्चे दूध घालून नीट एकत्र करावे. हे मिश्रण हलक्या हाताने तुमचा चेहरा, गळा आणि मानेवर लावावे. 15 ते 20 मिनिटांनी पॅक वाळल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा आणि टॉवेलने हलक्या हाताने टिपून घ्या. हा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी एक्सफॉलिएटरच्या स्वरूपात कार्य करतो. या पॅकमुळे डेड स्कीन काढली जाते.

चंदन पावडर आणि गुलाब पाकळ्यांचा फेसपॅक

गुलाब पाकळ्यांची वाटून पेस्ट बनवा. त्यामध्ये थोडं कच्च दूध आणि चंदनाची पावडर घालून मिश्रण नीट मिक्स करा. हा पॅक चेहऱ्यावर व मानेवर लावा. थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवा. या फेसपॅकचा वापर तुम्ही आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा करा.

कोरफड व गुलाबाचा फेसपॅक

एका बाऊलमध्ये गुलाब पाकळ्यांची पेस्ट घेऊन त्यात थोडे गुलाबजल घालावे. व थोडे कोरफड जेल घाला. मिश्रण नीट एकत्र करून चेहऱ्यावर लावा. वाळल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)