Neem Benefits For Beauty : पिंपल्स, मुरूमं, कोंड्याचा होईल नायनाट, कडुनिंबाचा असा वापर ठरेल गुणकारी

| Updated on: Aug 16, 2023 | 3:23 PM

कडुनिंबाच्या वापराने केस आणि त्वचा यांना अनेक प्रकारचा फायदा होतो. तुम्ही त्याची पेस्ट, तेल आणि फेसवॉश यांचाही वापर करू शकता.

Neem Benefits For Beauty : पिंपल्स, मुरूमं, कोंड्याचा होईल नायनाट, कडुनिंबाचा असा वापर ठरेल गुणकारी
Image Credit source: freepik
Follow us on

Neem Benefits For Beauty  : कडुनिंबाच्या (neem benefits) पानांमध्ये बरेच औषधी गुणधर्म असतात, त्यामुळे त्या पानांचा औषध म्हणू वापर केला जातो. बऱ्याच ब्युटी प्रॉडक्टसमध्येही कडुनिंबाच्या पानाचा वापर होतो. ही पान त्वचा आणि केस दोन्हींसाठी (good for skin and hair) उत्तम ठरतात. कडुनिंबाच्या पानांचा वापर करून तुम्ही मुरुमं, डार्क सर्कल्स हटवू शकता. तसेच याच्या वापराने कोंडाही दूर होऊ शकतो.

केस आणि त्वचा यासाठी विविध प्रकारे तुम्ही कडुनिंबाची पाने वापरू शकता. त्याचे काय फायदे आहेत आणि त्याचा वपर कसा करावा हे आपण जाणून घेऊया.

मुरुमं होतात ठीक

कडुनिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. मुरुमं दूर करण्यासाठी तुम्ही कडुलिंबाचा फेस वॉश आणि कडुनिंबाचा साबण वापरू शकता. कडुलिंबाच्या पानांपासून बनवलेल्या पेस्ट वापरल्याने मुरुमांमुळे होणारी जळजळ कमी होते. त्यामुळे त्वचेचा लालसरपणा कमी होतो. कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून त्वचेवर लावू शकता.

डार्क सर्कल
कडुनिंबामध्ये अँटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात. तुम्ही कडुलिंबाच्या पानांची पेस्ट त्वचेवर 10 मिनिटे लावू शकता.थोड्या वेळाने ती काढून टाका. यामुळे तुमच्या त्वचेला थंडावा मिळेल. यामुळे डार्क सर्कलची समस्या दूर होईल.

त्वचेची जळजळ

त्वचेची जळजळ दूर करण्यासाठी तुम्ही कडुनिंबाच्या पानांचा वापर करू शकता. त्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. कडुनिंबाची पाने त्वचेचा लालसरपणा, खाज आणि सूज दूर करतात. कडुनिंबाच्या पानांच्या वापराने त्वचेचा लालसरपणा कमी होतो.

मॉयश्चरायझर

कडुनिंब हे त्वचेसाठी नैसर्गिक मॉयश्चरायझर म्हणून काम करते. या पानांचा वापर केल्यास त्वचा हायड्रेट होते व पोषणही मिळते. कडुनिंबामध्ये फॅटी ॲसिड व व्हिटॅमिन ई असते. तसेच त्यामध्ये अँटी एजिंग गुणधर्मही असतात. कडुनिंबाची पानं वापरल्याने आपली त्वचा मुलायम होते.

पिगमेंटेशन

पिगमेंटेशन आणि अनइव्हन स्किन टोनपासून बचाव करण्यासाठी तुम्ही कडुनिंबाचा वापर करू शकता. त्यामध्ये व्हिटॅमिन सी असते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)