मुंबई : ‘तुळशी’ ही हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र वनस्पती मानली जाते. त्याच वेळी, आयुर्वेदात तुळशीला औषधी वनस्पती म्हणून अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. तुळशीचे सेवन आपल्या शरीराला बर्याच आजारांपासून सुरक्षित ठेवते. ती केवळ एक वनस्पतीच नाही तर, रोग प्रतिकारशक्ती वाढवणारी इम्युनिटी बूस्टर आणि अँटी-बायोटीक देखील आहे (Tulsi Aka Basil leaves overdosage can harm your body).
आयुर्वेदात रोज सकाळी तुळशीची पाने चावून खाण्याचा सल्ला दिला जातो. चहामध्ये तुळशीची पाने घातल्याने चहाची चव वाढते. तसेच, तुळशीचा चहा पिल्याने अनेक रोगांचे संक्रमण बरे होते. परतू, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, तुळशीचे जास्त सेवन केल्याने आपल्या आरोग्यासही हानी पोहचू शकते.
हायपोग्लाइसेमिक पातळी नियंत्रित करण्याचे गुणधर्म तुळशीच्या पानांमध्ये आढळतात. या कारणास्तव, लोक रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी तुळशीची पाने चघळतात. जेव्हा, मधुमेह असणारे रुग्ण आधीच शुगर कंट्रोल करणारी औषधे घेत असतील आणि एकत्रितपणे तुळशीचे भरपूर सेवन करत असतील, तेव्हा त्यांच्या रक्तातील साखर एकदम कमी होण्याची समस्या देखील उद्भवू शकते. हे त्यांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत जास्त तुळस न खाण्याचा सल्ला दिला जातो.
तुळशीचे अति प्रमाणात सेवन गर्भवती महिलांसाठीही हानिकारक आहे. या पानांमध्ये युजेनॉल हा घटक उपस्थित आहे. ज्यामुळे स्त्रियांना मासिक पाळी येऊ शकते. म्हणून, तुळशीचे जास्त सेवन केल्याने गर्भवती महिलांना अतिसाराची समस्या होऊ शकते. अशावेळी डॉक्टर, गर्भवती महिलांना तुळशीचे जास्त सेवन न करण्याचा सल्ला देतात (Tulsi Aka Basil leaves overdosage can harm your body).
तुळशीमध्ये आढळणाऱ्या युजेनॉलमुळे अल्सर होऊ शकतो. जास्त प्रमाणात सेवन केल्याने चक्कर येण्याची समस्या देखील निर्माण होऊ शकते. यामुळे हृदय गती देखील वाढू शकते. तुळशीचा प्रभाव गरम आहे, म्हणून त्याचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. यामुळे, पोटात जळजळ, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून तुळशीची पाने मर्यादित प्रमाणातच खावीत.
तुळशीची पाने जास्त प्रमाणात सेवन केल्यास आपले रक्त पातळ होऊ शकते, असे आयुर्वेदाचार्य विनोद कुमार म्हणतात. ते सांगतात की, अँटी-क्लोटींग औषधांचे सेवन करणाऱ्या रुग्णांनी तुळशीची पाने खाऊ नयेत, कारण असे केल्याने शरीराचे नुकसान होऊ शकते. यासह, वाल्फरिन आणि हेपरिनसारखी औषधे घेणार्या लोकांहीना तुळशीचे अधिक सेवन करण्यास मनाई आहे.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)
(Tulsi Aka Basil leaves overdosage can harm your body)
Skin Care | थंडीमुळे कोरड्या पडलेल्या चेहऱ्याला मॉश्चराइझ करायचंय? वापरा घरगुती ‘स्ट्रॉबेरी फेस पॅक’!#strawberry | #skincare | #skincareroutine | #skincaretips https://t.co/K0gUjPPFHn
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 12, 2021